आज २८ जुलै २०२४ रविवार रोजी, चंद्राचे मंगळच्या मेष राशीत भ्रमण होत आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असून, या दिवशी कालाष्टमी आहे. आज शुक्रादित्य योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.
आजचा दिवस मंगलमय आहे. मनासारखा खर्च कराल. गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्यांना काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. लोकप्रियता समाजकारणाची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. किर्ती व मान सन्मान मिळेल.
आज प्रसिद्धि मिळेल. घरासंबंधी समस्या दूर होतील. अडलेली कामे मार्गी लागतील. परदेशगमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी व प्रसन्न राहील.
आज नवीन योजनेची सुरुवात कराल. जोश पूर्वक कामात रस घ्याल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. मनासारख्या घटना घडतील. आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. सहकार्य लाभेल. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात.
आज घर किंवा वाहन खरेदी कराल. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगती कारक दिवस आहे. आपला नावलौकिक वाढेल. गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील.
आज कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. दूरच्या प्रवासाचे योग येतील. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा. कायदेशीर बाबी पूर्ण करा. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
संबंधित बातम्या