आज रविवार २८ जानेवारी रोजी, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी असून, या दिवशी शोभन योग, सौभाग्य योग आणि मघा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने त्यांना लाभ होणार आहे.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात घरातील अनेक अडचणी सोडवाल. ध्येयापर्यंत पोहचण्याचा फार मोठा गुण तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्यावर मात कराल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. घरगुती वातावरण चांगले राहिल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.
आज सौभाग्य योगात खरेदी आणि शुभ कामासाठी दिनमान मंगलमय आहे. गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखक वर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. सद्गुरूंचा वरदहस्त राहील. तुमच्यातील सद्गुणांची लोक कदर करतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. देश-विदेशाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. अध्ययन आणि अध्यापनामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. घरासंबंधी समस्या दूर होतील.
आज ग्रहयोग उत्तम आहे. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराट होऊ शकते व आकस्मिक धनलाभ होईल. मान-सन्मान मिळेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. नवीन योजनेची सुरुवात कराल. जोशपूर्वक कामात रस घ्याल. जुनी मित्रमंडळी भेटतील. मोठा आर्थिक लाभ होणार आहे.
आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढीस लागेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. अंगीभूत गुणासाठी चांगले वातावरण राहील. संत साहित्य आध्यात्मीक स्वरुपाचे लेखन होईल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगतीचा दिवस आहे. आपला नावलौकिक वाढेल. गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलार्जित संपत्तीतून फायदा होईल.