मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : संकष्ट चतुर्थीला या ५ राशींवर राहील लंबोदराची कृपा, प्रगतीकारक दिवस

Today lucky zodiac signs : संकष्ट चतुर्थीला या ५ राशींवर राहील लंबोदराची कृपा, प्रगतीकारक दिवस

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 28, 2024 01:16 PM IST

Lucky Rashi Today 28 february 2024: आज २८ फेब्रुवारी २०२४ बुधवार रोजी, संकष्ट चतुर्थी असून, ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात या ५ राशींना नशीबाची उत्तम साथ मिळेल.

lucky zodiac signs today 28 february 2024
lucky zodiac signs today 28 february 2024

आज बुधवार २८ फेब्रुवारीला चंद्र कन्या राशीनंतर तूळ राशीत जाणार आहे. तसेच आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून या तिथीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीला वृद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 5 राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.

मेषः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात अनुकूल वातावरण निर्माण होईल. एखादी गोष्ट धडाडीने कराल. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे कराल. मुलांच्या अडचणी समजून घेण्यात यशस्वी व्हाल. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. विद्यार्थ्यांसाठी शुभयोग आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात लाभ होईल. पुरस्कार मिळतील. यशदायक दिवस आहे.

वृषभः 

आज उत्तम दिवस राहणार आहे. स्थावर मालमत्तेसंबंधी महत्त्वाचे निर्णय घ्याल. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा मात्र टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान-सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील. आरोग्य उत्तम राहील. भरभरटीचा दिवस आहे.

कन्याः 

आज आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. व्यवसायात नवीन संधी मिळतील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. स्तुतीस पात्र ठराल. नशीबाची उत्तम साथ लाभेल.

कुंभ: 

आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्याल. मनोबल उंचावेल. प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मान-सन्मानात वृद्धी होईल. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मीन: 

आज नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. घरातील मोठ्या माणसांचा वरदहस्त राहील. तुमचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरेल. आपापल्या क्षेत्रात प्रचंड झेप घ्याल. नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढेल. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मोठे पद, मान-सन्मान, प्रसिद्धी मिळेल.

विभाग