आज बुधवार २८ ऑगस्ट रोजी, चंद्राचे बुधच्या मिथुन राशीत भ्रमण होत आहे, जिथे मंगळ आधीपासून आहे, त्यामुळे महालक्ष्मी योग तयार होत आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील दहावी तिथी असून, या दिवशी महालक्ष्मी योगासह सिद्धी योग आणि मृगाशिरा नक्षत्र यांचा शुभ संयोग असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.
आज भाग्यकारक घटना घडतील. लक्ष्मीयोगात आकस्मिक आर्थिक लाभ होतील. मनस्वास्थ उत्तम राहील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास लाभदायक होईल.
आर्थिक बाबतीमधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. काम करण्याचा उत्साह वाढेल. कर्ज मंजूर होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. रखडलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. निर्णायक यश मिळेल.
आज वणिज करणात आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. प्रेमीजनांना त्यांची आवडती व्यक्त भेटल्यामुळे आनंदी राहाल. अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. बढतीची संधी आहे. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक जिवन आनंदी राहील. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संततीविषयी चिंता मिटेल. जमीन खरेदी-विक्रीतून अधिक लाभ होईल. शिक्षक वर्गाचा मान-सम्मान वाढेल. मानधनात वाढ होईल.
आज दिवस उन्नती कारक आहे. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध बंड पुकाराल. शैक्षणिक क्षेत्रात विशेष संधी मिळतील. कामाची गती वाढवेल. वाहन घर खरेदी साठी शुभ दिवस आहे. आर्थिक सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आनंद दायक राहील.
आज कामानिमित्त परदेश गमनाच्या संधी मिळतील. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. घरात जवळच्या माणसांचे उत्तम सहकार्य मिळेल. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. बढतीचे योग आहेत. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. आरोग्यही उत्तम राहील. शुभ दिनमान असेल. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल.