आज शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी, चंद्र स्वतःच्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असून, या तिथीला एकादशी तिथीचे श्राद्ध केले जाईल.
आज तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. व्यावसायिकांना उत्तम प्रतिसाद मिळेल. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. गुंतवणूक लाभ देणार आहे. रखडलेल्या कामास गती मिळेल.
आज कार्यक्षेत्रात उत्तम ठसा निर्माण करण्यास तुम्ही वरचढ ठरणार आहात. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. मनासारखी कामे होतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल.
आज कष्टाचे चीज होईल. ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल.
आज वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. पराक्रमाची शर्थ कराल. यशाकडेच वाटचाल राहील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्य पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. प्रसन्न वातावरण राहील.
आज प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. तब्येत खूष राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. नवीन योजना पूर्णत्वास जातील. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील.