आज आश्विन कृष्ण एकादशी तिथी आहे. राहुकाळ संध्याकाळी ०४.३० वाजल्यापासून ते ०६ वाजेपर्यंत असेल. एकादशी तिथी सुर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर द्वादशी तिथीचा प्रारंभ होईल. तर चंद्र आज दिवस-रात्र सिंह राशीत असणार आहे. अशात आज ४ राशींना आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. या राशींमध्ये वृश्चिक,धनु, मकर आणि मीन या राशींचा समावेश आहे. पाहुया या राशींना आज कशाचा लाभ होणार आहे!
आज वृश्चिक राशीच्या जातकांसाठी मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस आहे. या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळेल. शिक्षणाच्या बाबतीत एखाद्याला तुम्ही मदत केल्यास तुमचे खूप कौतुक होईल. करिअरमध्ये तुमची कामगिरी सातत्यपूर्ण राहिल्यास तुमच्या करिअरचा आलेख उंचावू शकतो. आपण लवकरच एखाद्या पर्यटनस्थळी फिरायला जाण्याची योजना आखू शकता. आज तुम्हाला तुमच्या सोशल नेटवर्किंगचे अनेक फायदे मिळू शकतील. निरोगी खाण्याच्या सवयी बाळगल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे.
आज धनु राशीच्या जातकांसाठी फायद्याचा दिवस आहे. आज तुम्ही चांगला नफा कमावण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या व्यावहारिकतेमुळे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी लोकप्रिय बनाल. प्रेमीजीवनासाठी देखील आजचा दिवस चांगला आहे. आपण आपल्या प्रियकरासोबत किंवा प्रेयसीसोबत रोमँटिक क्षण घालवू शकाल. आज तुमचे तुमच्या घराच्या सजावटीकडे लक्ष वेधले जाईल. काही लोक आपले घर सजवण्याचा विचार करू शकतात. कॅंडल लाइट डिनरप्लॅन करून पार्टनरची संध्याकाळ खास बनवावी. आज तुमच्यावर कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. आरोग्यदायी पदार्थांची खाण्यासाठी निवड केल्यास त्याचा तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने चांगला फायदा होईल.
आज एखाद्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करत असाल तर आज या कामात तुम्हाला काही अडचणी सतावू शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबाबत जे काही स्वप्न पाहिले असेल ते लवकरच पूर्ण होऊ शकते. कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी सर्वांशी चांगली वागणूक दाखवलीत तर तुम्हाला पदोन्नती मिळून चांगले पद मिळवू शकता. गरज पडल्यास तुमचा जोडीदार तुम्हाला काही चांगल्या सल्ला देण्याची शक्यता आहे. आनंदाची बाब म्हणजे तुमच्या मालमत्तेचे मूल्य अनेक पटींनी वाढण्याची शक्यता आहे. या बरोबरत तुमचा पगार वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
आज मीन राशीच्या जातकांसाठी परिवर्तनाचा आनंद घेण्याची वेळ आहे. व्यावसायात तुम्हाला तुमचे एखादे काम अवघड वाटत असल्यास ही कोंडी फोडण्यासाठी तुम्ही तुमच्या वरिष्ठांचा सल्ला घेऊ शकता. त्याने अवघड काम सोपे वाटेल. आजचा दिवस कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याचा आहे. पैशाच्या बाबतीत आज शहाणपणाने निर्णय घ्या. आपण आज सुट्टीवर जाण्याचा बेत आखू शकता. काही लोकांसाठी, बालपणीच्या मित्राला भेटणे शक्य होणार आहे. आज पुरेसे पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवा.
डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.