Lucky Rashi Today 25 march 2024 : आज (२७ मार्च) चंद्र शुक्र आणि मंगळाशी संयोग करीत असुन शुक्राच्या राशीतुन तर मंगळाच्या नक्षत्रातुन गोचर करणार आहे. व्याघात योग आणि वणिज करण असा दुहेरी शुभ योग घटीत होत आहे. अशा स्थितीत ५ राशींना आजचा दिवस शुभ असणार आहे. त्या ५ भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ते येथे जाणून घेणार आहोत.
मेषः आज चंद्राचा मंगळाशी होत असलेला योग पाहता व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध घेतील. तुमची निरीक्षण क्षमता आणि कल्पनाशक्ती यांचा वापर योग्य रितीने कराल तर बऱ्याच समस्या सुटतील. पैशाची कामे होतील. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. शासकीय नोकर दारासाठी यशाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल.
वृषभ: आज शुक्राशी होणारा चंद्राच्या योग पाहता कला क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम संधी मिळतील. कामातील बदल हा सुद्धा तुम्हाला काम करण्यासाठी उत्साहदायी ठरेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. व्यवसाय असणार्यांना आपला धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. मन प्रसन्न राहिल. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहील. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल.
मिथुन: आज अनुकूल ग्रहयुतीत एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणारांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. झालेले बदल जितके लवकर आत्मसात कराल तेवढा यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृश्चिकः आज चंद्रगोचर शुक्राशी शुभ संयोग करत आहे. कलाकारांच्या कलेला दाद मिळेल. नवनवीन कल्पना सुचतील. तरुणांना प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. साहित्य क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक कायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल.
सिंहः आज चंद्रबल लाभल्याने कामाचा दर्जा वाढवण्या वर तुमचा भर राहील. मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा मात्र टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत कायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील.
संबंधित बातम्या