Lucky Zodiac Signs : विजय मिळवाल, आर्थिक आवक वाढेल! आज 'या' ५ राशीचे लोकं ठरतील नशीबवान
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : विजय मिळवाल, आर्थिक आवक वाढेल! आज 'या' ५ राशीचे लोकं ठरतील नशीबवान

Lucky Zodiac Signs : विजय मिळवाल, आर्थिक आवक वाढेल! आज 'या' ५ राशीचे लोकं ठरतील नशीबवान

Published Jun 27, 2024 04:00 AM IST

Lucky Rashi Bhavishya 27 June 2024 : आज षष्ठी तिथी असून, या दिवशी रवियोग, आयुष्मान योग, सौभाग्य योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात या ५ राशींना दिवस लकी ठरेल.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २७ जून २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २७ जून २०२४

आज २७ जून २०२४ गुरुवार रोजी, चंद्र कुंभ राशीनंतर मीन राशीत जाणार आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून, या दिवशी रवियोग, आयुष्मान योग, सौभाग्य योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार राशीच्या लोकांना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे. या आहेत आजच्या ५ लकी राशी.

मेष: 

आज अनुकुल दिवस राहील. व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील. कुटुंबातीलच व्यक्ती तुमच्या फायद्याच्या ठरतील. अचानक धनप्राप्तीचे उत्तम संयोग निर्माण होतील. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. घरात मंगलकार्याचे आयोजन होईल.

सिंहः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात उत्तम धनप्राप्तीचाही योग आहे. व्यापार व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. व्यवसायातील नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. परदेश भ्रमणासाठी अनुकुल दिवस आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.

तूळ: 

आज भाग्यदायक घटना घडतील. तुमच्या नवीन कल्पनांच स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. आपल्या तार्किक बुद्धीने प्रति स्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मनात उत्साह राहील. जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. 

वृश्चिक: 

आज आर्थिक बाबतीत अनुकुलता असणार आहे. समाजात प्रतिष्ठा मिळेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. परदेशगमनाच्या संधी येतील. आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. अचुक निर्णयामुळे यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. जोडीदाराकडून गृहसौख्य उत्तम मिळेल. कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. 

कुंभ: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात मित्र परिवारामध्ये रमाल. आर्थिक गुंतवणूक कराल. आर्थिक स्त्रोत वाढेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. मनोरंजन करण्याकडेही कल राहील. धंद्यात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. वैवाहीक जीवनात आनंदाची बातमी मिळेल. नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. 

Whats_app_banner