आज २७ जुलै २०२४ शनिवार रोजी, चंद्र मीन राशीनंतर मेष राशीत जाणार आहे आणि शनिदेव मूळ त्रिकोण कुंभ राशीत स्थित आहे, त्यामुळे शश राजयोग तयार होत आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी असून या दिवशी शश राजयोगासोबत रवियोग, शुक्रादित्य योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार हे शुभ योग तयार होत असल्याने ५ राशींना लाभ होणार आहे.
आज नातेवाईकांकडून चांगले सहकार्य मिळेल. रोजगारात नवीन संधी उपलब्ध होणार आहे. कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील. सत्ताधारी प्रशासन यांच्या कडून सहकार्य लाभेल.
आज जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर-वाहन खरेदीचे योग येऊ शकतात. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. व्यापारी वर्गासाठी बर्याच संधी प्राप्त होतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी राहाल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल.
आज नवीन योजना यशस्वी होतील. मनःशांती मिळेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. इच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल.
आज आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. कामे पूर्णत्वाला न्याल. अडकलेली कामे पार पडतील. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. कला क्षेत्रातील मंडळींनी या शुभ दिवसाचा फायदा करून घ्यावा. पत्नीकडून कडून अपेक्षेप्रमाणे साथ मिळेल. व्यापारात फायदा होईल. नोकरीत बढतीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल.
आज धंद्यात वाढ होईल. नोकरी व्यवसायात आपला वेगळा ठसा उमटवाल. रोजगारात तुमची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. कलाक्षेत्रातील महिला अनुकूल प्रगतीच शिखर गाठतील. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेने अधिक लाभ होईल. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रगतीकारक ग्रहमान आहेत.