आज शनिवार २७ जानेवारी रोजी, चंद्र कर्क राशीनंतर सिंह राशीत जाणार आहे. तसेच आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी आयुष्मान योग, सौभाग्य योग, लक्ष्मी नारायण योग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींसाठी आज शुभ योग तयार होत असल्याने त्यांना फायदा होणार आहे.
आज प्रगतीकारक ग्रहमान आहेत. आनंदी आणि उत्साही राहाल, यामुळे इतरांनाही आनंदी कराल. घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. घरातील सजावटीसाठी खरेदी कराल. मुलांकडून धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. आपला वेगळा ठसा उमटवाल. रोजगारात तुमची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यवसाय विस्तारेल. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यशाची संधी मिळेल. कलाक्षेत्रातील महिला प्रगतीचे शिखर गाठतील. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात नवीन योजना यशस्वी होतील. मनःशांती मिळेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. फिरायला जाण्याचे नियोजन होईल. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. कुटुंबातून आपल्या कार्यास प्रोत्साहन मिळेल. दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. आर्थिक रखडलेली कामे पार पडतील. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारात फायदा होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा दिवस आहे. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल.
आज आकस्मिक धनलाभाचा योग आहे. राजकारणातील व्यक्तींना समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. कमी श्रमात जास्त संपत्ती मिळण्याची कला अंगी येईल. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कुटूंबातील सदस्याचे आपल्या विषयी चांगले मत असेल. कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सामील व्हाल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात अनेक कामे बुद्धीच्या जोरावर मार्गी लागतील. कामात यश मिळण्याचे योग आहेत. मानसिक स्वास्थ्य लाभेल. दुसऱ्यांना कामाला लावाल. खेळाडूंसाठी चांगला दिवस आहे. शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळ्या संधी मिळतील. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. स्पर्धापरिक्षेत प्राविण्य मिळेल. कौटुंबिक सौख्य वाढेल. परदेश भ्रमणाची शक्यता आहे, प्रवासातुन लाभ होईल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)