Lucky Zodiac Signs : नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल! या ५ लकी राशींचे आर्थिक स्त्रोत वाढतील-lucky zodiac signs today 26 september 2024 astrology predictions for mithun sinh tula dhanu meen rashi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल! या ५ लकी राशींचे आर्थिक स्त्रोत वाढतील

Lucky Zodiac Signs : नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल! या ५ लकी राशींचे आर्थिक स्त्रोत वाढतील

Sep 26, 2024 09:30 AM IST

Lucky Rashi Bhavishya 26 September 2024 : आज भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी असून, पितृ पक्षाच्या दशमी श्राद्धाच्या दिवशी गुरु पुष्य योगाव्यतिरिक्त अमृत सिद्धी योग आणि पुनर्वसु नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे, आजचा दिवस या ५ लकी राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे.

लकी राशीभविष्य, नशीबवान राशी २६ सप्टेंबर २०२४
लकी राशीभविष्य, नशीबवान राशी २६ सप्टेंबर २०२४

आज गुरुवार २६ सप्टेंबर रोजी, चंद्र मिथुन राशीनंतर कर्क राशीत जाणार आहे आणि या दिवशी पुष्य नक्षत्र पडत आहे, त्यामुळे गुरु पुष्य योग तयार होत आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची दशमी तिथी असून, या तिथीला दशमीचे श्राद्ध केले जाईल, या दिवशी गुरु पुष्य योगाव्यतिरिक्त अमृत सिद्धी योग आणि पुनर्वसु नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

मिथुन: 

आज दिवस शुभ लाभदायी असणार आहे. आर्थिक प्रश्न सुटतील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. अपेक्षित यश संपादन करता येईल. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील. वास्तु खरेदी विक्रीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे. महिलांना धार्मिक सत्संग उत्तम घडेल. 

सिंह: 

आज आर्थिक बाबतीत अनुकुलता असणार आहे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. प्रिय व्यक्तीसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी दर्शवाल. परदेशग मनाच्या संधी येतील. आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. योग्य नियोजन आचुक निर्णय यामुळे यश लाभेल. शुभवार्ता ऐकायला मिळेल. सरकारी कामातुन लाभ होईल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. मनोरंजनाकडे कल राहील. कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची साथ लाभेल. 

तूळ: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. व्यापार व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. व्यवसायातील नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. परदेश भ्रमणासाठी अनुकुल दिवस आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. नशीबाची साथ लाभेल.

धनु: 

आज आर्थिक गुंतवणूक कराल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. बौद्धीक कसरती करण्याबरोबरच मनोरंजन करण्याकडेही कल राहील. धंद्यात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील. अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. 

मीन: 

आज महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिनमान आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यश देणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहील. प्रवासाचे योग आहेत. योग्य समन्वय साधाल. शांतप्रिय स्वभाव आणि गुणवैशिष्टयामुळे पुरेपूर फायदा होईल.

Whats_app_banner