Lucky Zodiac Signs : आजचा दिवस प्रेमी जीवांचा, उत्तम आरोग्यही लाभणार; या ३ लकी राशी ठरणार नशीबवान
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : आजचा दिवस प्रेमी जीवांचा, उत्तम आरोग्यही लाभणार; या ३ लकी राशी ठरणार नशीबवान

Lucky Zodiac Signs : आजचा दिवस प्रेमी जीवांचा, उत्तम आरोग्यही लाभणार; या ३ लकी राशी ठरणार नशीबवान

Oct 26, 2024 01:09 AM IST

Lucky Rashi Bhavishya 26 October 2024 :आज चंद्र आपली स्वरास कर्कमध्ये सकाळी ९.४४ मिनिटांपर्यंत असेल, तर त्यानंतर चंद्राचा सिंह राशीत प्रवेश होत आहे. आज कार्तिक मासाची कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. ही स्थिती आज कर्क, तूळ आणि वृश्चिक राशीच्या जातकांसाठी उत्तम आरोग्य आणि आनंद घेऊन येत आहे.

आजचा दिवस प्रेमी जीवांचा, उत्तम आरोग्यही लाभणार!
आजचा दिवस प्रेमी जीवांचा, उत्तम आरोग्यही लाभणार!

Lucky Zodiac Signs: आज चंद्र आपली स्वरास कर्कमध्ये सकाळी ९.४४ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर, त्यानंतर चंद्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. आज कार्तिक मासाची कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. आज शनिवार आहे. हा वार हनुमान आणि शनी देवाला समर्पित आहे. या दिवशी भगवान हनुमान आणि शनिदेवाची पूजा केली जाते. हनुमान आणि शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. ज्योतिषीय गणनेनुसार २६ ऑक्टोबरचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे. चला जाणून घेऊया, २६ ऑक्टोबर २०२४ रोजी १२ राशींपैकी कर्क, तूळ आणि वृश्चिक या तीन राशी लकी ठरल्या आहेत. जाणून घेऊ या या तीन राशींच्या जातकांना काय होईल फायदा…

कर्क

असे म्हणतात की आरोग्य हे सर्वात मोठे धन आहे. आज कर्क राशीच्या जातकांचे आरोग्य उत्तम राहणार आहे. चेहऱ्यावर हसू ठेवल्यास आज तुमचा आत्मविश्वास दिसून येणार आहे. कार्यालयात तुम्ही आज उत्तम काम कराल. त्यामुळए सहकाऱ्यांना तुमची उत्पादकता जास्त असल्याचे स्पष्ट होईल. विशेष म्हणजे आज कन्या राशीच्या जातकांचे आरोग्य तर उत्तम राहणारच आहे, परंतु या जातकांचे आर्थिक जीवनही चांगले राहणार आहे. आज गुंतवणुकीसाठी समंजसपणे योग्य निर्णय घ्याल. कितीही आव्हाने आली तरी सर्व आव्हानांवर तुम्ही आज मात करणार आहात.

तूळ

तूळ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. आज तुम्ही तुमच्या प्रेमजीवनावर लक्ष केंद्रित केलेत तर आजचा दिवस आणखी चांगला होणार आहे. ऑफिसमध्ये आज तुम्ही तुमची उत्पादनक्षमता दाखवणार आहात. यामुळे वरिष्ठांनी तुमच्यावर सोपवलेली सर्व कामे पूर्ण कराल. हे पाहून तुमची वाहवा होईल. तुमची आर्थिक स्थिती आणि आरोग्य दोन्ही दिवसभर चांगले राहील. सकारात्मक संबंध राखणे आपल्यासाठी दीर्घकाळ फायदेशीर ठरेल.

वृश्चिक

प्रेमजीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस वृश्चिक राशीच्या जातकांसाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. आज वृश्चिक राशीच्या जातकांनी नि:संकोचपणे आपले प्रेम व्यक्त करावे. कारण, प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. इतकेच नाही तर आपले प्रेम परत मिळवण्यासाठी देखील वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच आजची आश्विनी कृष्ण दशमीची तिथी तुमच्यासाठी उत्तम आरोग्यही घेऊन येणार आहे.

Disclaimer: येथे प्रदान केलेली माहिती केवळ गृहीतके आणि मान्यतेवर आधारित आहे. येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे की आम्ही कोणत्याही माहितीचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

 

 

Whats_app_banner