मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : त्रिग्रही योग 'या' राशींसाठी ठरणार फायदेशीर! पाहा आजच्या ५ लकी राशी

Lucky Zodiac Signs : त्रिग्रही योग 'या' राशींसाठी ठरणार फायदेशीर! पाहा आजच्या ५ लकी राशी

May 26, 2024 11:29 AM IST

Lucky Rashi Bhavishya 26 May 2024 : आज २६ मे रोजी गुरु, शुक्र आणि सूर्य यांच्या त्रिग्रही योगासोबतच गुरुआदित्य योगसुद्धा जुळून आला आहे. शुभ योग-संयोगात या ५ राशींचे भाग्य चमकणार आहे.

लकी राशीभविष्य, नशीबवान राशी २६ मे २०२४
लकी राशीभविष्य, नशीबवान राशी २६ मे २०२४

जोतिष शास्त्रानुसार आज गुरु, शुक्र आणि सूर्य यांचा त्रिग्रही योग निर्माण होत आहे. तसेच गुरुआदित्य योगसुद्धा जुळून आला आहे. आज शुभ योग आणि बवकरण सुद्धा आहे. या सर्व शुभ योग-संयोगाचा परिणाम काही राशींवर शुभ स्वरुपातच असणार आहे. पाहूया आज या ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमध्ये राशीचक्रातील कोणत्या ५ राशी नशीबवान ठरणार आहेत.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सुरु असलेले मतभेद आज संपुष्ठात येतील. मनमोकळेपणाने संवाद झाल्याने नातेसंबंध दृढ होतील. व्यवसायात धनलाभाचे नवे मार्ग खुले होतील. त्यामुळे मन समाधानी राहील. मात्र अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊन मनातल्या गोष्टी बोलणे टाळा. अथवा तुमच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. महत्वाच्या कामात भावंडांचा पाठिंबा मिळेल. भूतकाळात केलेल्या गुंतवणूकीचा फायदा आता मिळणार आहे.

वृषभ

आज रविवारचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी उत्तम असणार आहे. आजच्या दिवशी वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनपेक्षितपणे पैसे हातात आल्याने मन उत्साही राहील. एखाद्या समारंभात आवर्जून सहभागी व्हाल. त्यामुळे मन प्रसन्न होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने मानसन्मान वाढेल. उद्योग-व्यवसाय करणाऱ्या लोकांना एखादी मोठी गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. समाजातील नामांकित लोकांना भेटण्याचा योग जुळून येईल. त्यामुळे तुमचीही प्रतिष्ठा वाढेल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. घरामध्ये महागड्या वस्तूंची खरेदी कराल. तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना मोठे यश मिळेल. महिला कलाकारांना आज आपली कला दाखवण्याची उत्तम संधी मिळेल. भागीदारात व्यवसाय करण्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. शिवाय व्यवसायात कमी काळासाठी केलेली गुंतवणूक फलदायी ठरणार आहे. मुलांकडून तुमच्या धैर्याचे आणि कष्टाचे कौतुक होईल.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज चंद्र आणि मंगळ यांच्या संयोगात नवमपंचम योग तयार होत आहे. व्यवसायात नव्या आर्थिक संधी उपलब्ध होतील. नोकरीमध्ये बढती मिळण्याचा योग आहे. तुमच्या प्रत्येक कार्यात कुटुंबातून सहकार्य लाभेल. जोडीदारासोबत नातेसंबंध सुधारतील. तरुणांना प्रेमप्रकरणात मनासारखे यश मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी प्रसिद्धी मिळेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीमधून धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या बुद्धी कौशल्याने वरिष्ठांना प्रभावीत करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात मोठे प्रकल्प हाती येतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगतिकारक दिनमान आहे. कामानिमित्त प्रवास घडेल. आणि त्यातूनसुद्धा लाभच होईल. अचानकपणे आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून आर्थिक सहकार्य लाभेल.

WhatsApp channel