मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : षडाष्टक योग आज करणार चार राशींची भरभराट

Today lucky zodiac signs : षडाष्टक योग आज करणार चार राशींची भरभराट

HT Marathi Desk HT Marathi
Mar 26, 2024 12:14 PM IST

Lucky Zodiac sings today 26 march 2024 : मंगळ, शुक्र आज शनिशी षडाष्टक योग करीत आहे. हा योग काही राशींसाठी खूपच लाभदायी ठरणार आहे. कोणत्या आहेत या राशी? जाणून घेऊया…

 षडाष्टक योग आज करणार चार राशींची भरभराट
षडाष्टक योग आज करणार चार राशींची भरभराट

मिथुन

चंद्रभ्रमण आणि ग्रहमान आज अनुकूल आहे. लोकांचं मन जिंकून हवी ती कामं करून घ्याल. नकारात्मक गोष्टींना खंबीरपणे तोंड द्याल. जनमानसावर प्रभाव पाडाल. कर्तृत्वाला वाव मिळेल. प्रश्न व्यवस्थित हाताळाल. कठीण प्रसंगांतून मार्ग काढाल. संकटातून संधी निर्माण कराल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनचा योग आहे. हव्या त्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. इतरांवर विसंबून राहू नका. कौटुंबिक सौख्य लाभेल. आनंदाची बातमी मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.

सिंह

शुभ स्थानातील ग्रहयोग आज लाभदायी ठरेल. व्यवसाय उत्तम कराल, त्यातून मोठा आर्थिक लाभ मिळेल. आनंदी व उत्साही रहाल. नवी मालमत्ता घेण्याचा विचार कराल. नोकरीत सहकाऱ्यांची चांगली साथ लाभेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. वेळ चांगला जाईल. कलाकारांना यशाचा योग आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल. मानसन्मान वाढेल. अंगभूत कलागुणांना वाव मिळेल. नोकरीत पदोन्नतीचा योग आहे. वरिष्ठाचा विश्वास मिळवाल. मोठी जबाबदारी मिळू शकेल. नातेवाईकांशी संबंध उत्तम राहतील. धावपळ फायदेशीर ठरेल. रोजगारात नवीन योजना राबवाल.

तुला

आज अतिगंड योग आर्थिक लाभ देऊन जाईल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे मिळतील. कष्टातून साध्य झालेल्या यशाची चव चाखाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. परदेश प्रवासाचा बेत आहे. जोडीदाराशी सुसंवाद राहील. आर्थिक स्थिती सुधारेल, आवक वाढेल. तुमच्यामधील कलागुणांना न्याय मिळेल. नवीन कल्पनांवर काम कराल. कामानिमित्त परदेशवारीची संधी मिळेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची साथ लाभेल. त्यांची मर्जी राखाल. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. नव्या योजना कार्यान्वित करू शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होईल. प्रमोशनचा योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल.

मीन

चंद्रबळ लाभणार असल्यामुळं मीन राशीसाठी आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल. कामाचा दर्जा सुधारेल. दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढं राहाल. समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळं तुमच्याबद्दल इतरांना आदर वाटेल. तुमच्या उपस्थितीमुळं चैतन्य निर्माण होईल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मोठं यश लाभेल. नोकरीत मनाजोग्या गोष्टी घडतील. बदली किंवा पदोन्नतीचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसाय करत असाल तर नवे प्रस्ताव येतील. कुटुंबात सुखशांती आणि आनंदाचं वातावरण राहील. प्रवासातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून आर्थिक सहकार्य लाभेल.

WhatsApp channel