Lucky Zodiac Signs : बुधवारी हाती घेतलेल्या कामात यश मिळेल! आज 'या' ५ राशीचे लोकं ठरतील नशीबवान
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : बुधवारी हाती घेतलेल्या कामात यश मिळेल! आज 'या' ५ राशीचे लोकं ठरतील नशीबवान

Lucky Zodiac Signs : बुधवारी हाती घेतलेल्या कामात यश मिळेल! आज 'या' ५ राशीचे लोकं ठरतील नशीबवान

Jun 26, 2024 04:00 AM IST

Lucky Rashi Bhavishya 26 June 2024 : आजच्या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तिथीला लक्ष्मी नारायण योग, त्रिग्रही योग आणि श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात या ५ राशींना दिवस लकी ठरेल.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २६ जून २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २६ जून २०२४

आज २६ जून २०२४ बुधवार रोजी, चंद्र शनीच्या कुंभ राशीमध्ये स्थित आहे आणि मिथुन राशीमध्ये सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी असून या दिवशी बुधादित्य योगासह, प्रीति योग आणि घनिष्ठा नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशीच्या लोकांना याचा लाभ मिळेल. या आहेत आजच्या लकी राशी.

मिथुनः 

आज ग्रहांच्या शुभ योग-संयोगात जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल. 

कर्कः 

आज नवीन कार्यासाठी अनुकूल दिवस आहे. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. मित्रमंडळी भेटतील. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम असल्याने समाधान व्यक्त कराल. प्रसिद्धीचे योग आहे.  हाती घेतलेले काम पूर्ण होईल.

कन्याः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात दिवस लाभदायक ठरणार आहे. चांगली कामे मिळतील. वाहवा मिळवाल. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. नवीन कल्पना आखाव्या लागतील. प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. 

तूळ: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. आर्थिक लाभ देणारे ग्रहमान असल्यामुळे त्याचा फायदा होईल. मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. 

धनुः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. मुलांच्या करिअर संबंधी आर्थिक तरतूद करण्याकडे कल राहील. कुटुंबात तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. नवीन धोरणं योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. 

Whats_app_banner