आज शुक्रवार २६ जानेवारी रोजी, चंद्र स्वतःच्या कर्क राशीत भ्रमण करत आहे आणि पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी असून, या दिवशी प्रीति योग, आयुष्मान योग, त्रिग्रही योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने त्याचा लाभ होणार आहे.
आज शुभ वातावरण निर्माण होईल. उधारी होईल. एखादी गोष्ट जिद्दीने करण्यात तुमचा पुढाकार राहील. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. संततीच्या अडचणी यशस्वीरीत्या समजून घ्याल. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. सुवर्णमध्य काढावा लागेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. संपादन क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील. यशाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात कलाकारांना चांगला वाव मिळेल. दुसऱ्याला सहकार्य करण्यात तत्पर रहाल. तुमच्यातील गुण समाजासमोर आल्यामुळे लोकांची दाद चांगली मिळेल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. नोकरीत आर्थिक बाबतीत वृद्धीचे योग आहेत. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. क्षमतेमुळे यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहील. धार्मिक स्थळी प्रवास घडेल.
आज उत्तम दिवस राहील. संकटावर मात कराल. कामे उरकणार आहात. स्थावर मालमत्तेसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. प्रयत्नांना यश मिळेल. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील. आरोग्य उत्तम राहील. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगसंयोगात विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. प्रेमप्रकरणामध्ये तरुणांना यश मिळेल. जीवनाकडे खेळकर दृष्टीकोनाने पाहायला हवे. रखडलेली कामे पार पडतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. मान सन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात, आर्थिक व कौटुंबिक बाबतीत बदल घडणार आहेत. कामातून उत्तम मोबदला मिळू शकतो. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. प्रवासाचे योग आहेत.
आज महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. लेखकांच्या लिखाणाला उत्तेजन मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. व्यवसायात नवीन संधी मिळेल. आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. व्यवहार कुशलतेमुळे आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तुतीस पात्र ठराल. परमेश्वरावर विश्वास दृढ होईल. मानसिक स्वास्थ लाभेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल.
संबंधित बातम्या