आज सोमवार २६ ऑगस्ट रोजी, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमीचा सण देशभरात साजरा केला जात आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी चंद्र गुरु ग्रहासोबत वृषभ राशीत असेल, त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी जयंती योगासह गजकेसरी योग, हर्षन योग आणि रोहिणी नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे. यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या ५ राशींना कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शुभ योगाचा लाभ होणार आहे.
आज कामाचे नियोजन उत्तम केल्यास यश मिळेल. मध्यस्थीने कामे लवकर होतील. धंद्यातील कामे अंतिम टप्प्यावर जाऊन पोहोचतील. प्रसिद्धीचे योग येतील. कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी निर्माण होतील. प्रत्येक गोष्टीचे उत्तम चिंतन कराल. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. फायदेशीर काळ आहे. व्यवसाय वृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील.
आज तुमच्या धडाडीचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी अनेक सुधारणा कराल त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग येतील. यशाचा आनंद मिळणार आहे. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. खरेदीचे योग येतील. इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.
आज घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. कामाचा दर्जा सुधारून टाकाल. ऐषारामी जीवन जगावे असे वाटेल. उत्तमोत्तम खरेदी कराल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील.
आज भाग्याची साथ चांगली मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या मनातील गोष्टी पूर्ण होण्याच मार्गावर राहतील. लाबंच्या प्रवासाचे योग येतील. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास उत्तम संधी लाभणार आहे. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत.
आज देवधर्म पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल. प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद येईल. दिवस लाभदायक ठरणार आहे. आध्यात्मिक उन्नती साधाल. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल.