Lucky Zodiac Signs : 'या' राशींवर राहणार शनी देवाची विशेष कृपा! पाहा आजच्या ५ लकी राशी
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : 'या' राशींवर राहणार शनी देवाची विशेष कृपा! पाहा आजच्या ५ लकी राशी

Lucky Zodiac Signs : 'या' राशींवर राहणार शनी देवाची विशेष कृपा! पाहा आजच्या ५ लकी राशी

May 25, 2024 11:03 AM IST

Lucky Rashi Bhavishya 25 May 2024 : आज चंद्र वृश्चिक आणि धनु राशीतून अहोरात्र भ्रमण करणार आहे. शास्त्रानुसार आज सिद्ध-साध्य योग आणि वणिज करण योग आहे. अशात कोणत्या राशींचे लोकं नशीबवान ठरतील जाणून घ्या.

लकी राशी, नशीबवान राशीभविष्य २५ मे २०२४
लकी राशी, नशीबवान राशीभविष्य २५ मे २०२४

जोतिषशास्त्र एक असे शास्त्र आहे ज्यामध्ये ग्रह-नक्षत्रांच्या आधारे लोकांचे भविष्य सांगितले जाते. या ग्रह-नक्षत्रांच्या स्थान बदलवरून विविध बदल घडून येतात त्यामध्ये योग, तिथी असे प्रकार पडतात. या बदलांचा थेट परिणाम राशीचक्रातील राशींवर होत असतो. यामधील काही बदल राशींसाठी शुभ असतात तर काही अशुभही असतात. आज चंद्र वृश्चिक आणि धनु राशीतून अहोरात्र भ्रमण करणार आहे. शास्त्रानुसार आज सिद्ध-साध्य योग आणि वणिज करण योग आहे. याचा काही राशींवर अतिशय शुभ प्रभाव पडत आहे. जाणून घेऊया आजच्या त्या नशीबवान राशी कोणकोणत्या आहेत.

वृषभ

वृषभ राशीसाठी आज सिद्ध-साध्य योगाचा दिवस चांगला असणार आहे. आज जोडीदारासोबत चांगला वेळ घालवणार आहात. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीचा आता फायदा होईल. नोकरदार वर्गाला आज आर्थिक फायदा आणि मानसन्मान लाभेल. काही लोकांना अचानक पगारवाढ होण्याचे शुभ प्रसंग घडतील. मात्र सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी थोडासा चिंताजनक दिवस आहे. आज कुटुंबासोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येईल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. या राशीसाठी आज चंद्रबल उत्तम असल्याने प्रेमवीरांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. जोडीदारासोबत मनमोकळेपणाने संवाद होऊन नाते आणखी दृढ होईल. बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना मोठ्या लाभाचे प्रसंग येतील. सरकारी नोकरीत असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा आजचा दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना प्रभावी करण्यात यशस्वी व्हाल. कार्यक्षेत्रात विरोधकांचा डाव उधळून लावाल.

सिंह

सिंह राशीसाठीसुद्धा आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. या राशीसाठी आज चंद्रभ्रमण शुभ स्थानातून होत आहे. त्यामुळे सकारत्मक परिणाम दिसून येतील. अनेक दिवसांपासून विवाहासाठी उत्सुक असणाऱ्या तरुणांचे विवाह जुळून येतील. घरामध्ये मंगल कार्य घडत असल्याने वातावरण आनंदायी राहणार आहे. तरुणांना आवडत्या व्यक्तीजवळ प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांना विशेष परीक्षेत यश मिळेल. सायंकाळच्या वेळी मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. त्यामुळे मन प्रसन्न होईल.

तूळ

आज शनिवारचा दिवस तूळ राशीसाठी चांगला असणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. महत्वाच्या कामात धडाडीने निर्णय घ्याल. कुटुंबातील लोकांकडून प्रेम आणि आपुलकी मिळेल. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. घर-वाहन यांसारख्या भौतिक सुखाच्या वस्तूंची खरेदी होऊ शकते. मात्र आज बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. अथवा समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाऊ शकते.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. एखाद्या जुन्या कर्जाची परतफेड करण्यात यशस्वी व्हाल. त्यामुळे मनावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. मुलांसोबत संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्यात यश मिळेल. मंगळ ग्रहाचा शुभ प्रभाव असल्याने आज स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांना मनासारखे यश प्राप्त होईल. विवाहित लोकांना जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.

Whats_app_banner