मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : धुळवडीचा आजचा दिवस यशाचा, या ५ राशींची रखडलेली कामे मार्गी लागतील

Today lucky zodiac signs : धुळवडीचा आजचा दिवस यशाचा, या ५ राशींची रखडलेली कामे मार्गी लागतील

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 25, 2024 04:04 PM IST

Lucky Rashi Today 25 march 2024 : आज २५ मार्च २०२४ सोमवार रोजी ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात या ५ राशींना फायदेशीर दिवस होईल. वाचा या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

लकी राशीभविष्य २५ मार्च २०२४
लकी राशीभविष्य २५ मार्च २०२४

आज सोमवार २५ मार्च रोजी, होळीच्या दिवशी मंगळ आणि शुक्राच्या संयोगामुळे लक्ष्मी योग तयार होत आहे आणि चंद्र कन्या राशीत प्रवेश करत आहे. याशिवाय लक्ष्मी योगासोबतच वृद्धी योग, ध्रुव योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होणार असल्याने होळीच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार होळीच्या दिवशी ५ राशींना शुभ योगाचा लाभ मिळेल.

मिथुन: 

आज पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्र मैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेम प्रकरणात संबंध दृढ होतील.

कर्क: 

आज आर्थिक स्थिती बरी राहील. स्वतःचे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यापारात व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरीत आर्थिक बाबतीत वृद्धी होईल. मन समाधानी राहील. 

कन्या: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात प्रगती करणार आहात. तुमचे यश पक्के असेल. उत्साही आणि आनंदी असाल. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. 

वृश्चिक: 

आज आर्थिक घडी बसेल. कलाकरांना संधी मिळतील. जिद्दीने कामाला लागाल व यश मिळवाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना फायदेशीर दिवस आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. प्रतिष्ठा वाढेल.

धनु: 

आज नवीन संपत्तीसंबंधी प्रकल्प प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात जम बसेल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल.