Lucky Zodiac Signs : बाप्पाच्या कृपेने महत्वकांक्षा पूर्ण होतील! आज 'या' ५ राशीचे लोकं ठरतील लकी
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : बाप्पाच्या कृपेने महत्वकांक्षा पूर्ण होतील! आज 'या' ५ राशीचे लोकं ठरतील लकी

Lucky Zodiac Signs : बाप्पाच्या कृपेने महत्वकांक्षा पूर्ण होतील! आज 'या' ५ राशीचे लोकं ठरतील लकी

Published Jun 25, 2024 04:00 AM IST

Lucky Rashi Bhavishya 25 June 2024 : आजच्या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तिथीला लक्ष्मी नारायण योग, त्रिग्रही योग आणि श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात या ५ राशींना दिवस लकी ठरेल.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २५ जून २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २५ जून २०२४

आज २५ जून २०२४ रोजी, चंद्र मकर राशीनंतर कुंभ राशीत प्रवेश करणार आहे आणि शनि चंद्रापासून दुसऱ्या भावात प्रवेश करत आहे, त्यामुळे खास योग तयार होत आहे. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून, या तिथीला अंगारकी संकष्टी चतुर्थी तिथी उपवास केला जातो. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तिथीला लक्ष्मी नारायण योग, त्रिग्रही योग आणि श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज तयार होणाऱ्या शुभ योगाचा फायदा होणार आहे.

मिथुन: 

आज विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे राहतील. हाताखालच्या लोकांचे सहकार्य चांगले मिळेल. आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होतील. कामात उत्साह वाढणार आहे. व्यापारात आर्थिक फायदा होईल. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ नक्की मिळेल.

सिंहः 

आज वाद संपतील. सर्व खूष रहातील. प्रवासातून आर्थिक लाभ होईल. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. नोकरी व्यवसायात अचानक फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिकतेकडे जास्त कल राहील. गाठीभेठी होतील. आत्मविश्वासात वाढ झाल्याने कोणतेही काम सहजतेने करु शकाल. सरकारी काम वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. मौजमजा करण्याकडे कल राहील. 

तूळ: 

आज आर्थिक लाभ होईल. कामाच्या ठिकाणी योग्य तेथे कर्तव्य निभावाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन केली जाईल, त्याचा फायदा कामासाठी होईल. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. तुमच्या स्वभावातील वेगळे कंगोरे प्रकर्षाने दिसून येतील. कार्यक्षेत्रात वेळेचा चांगला सदुपयोग करून आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. कामकाज वाढेल. व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. 

धनुः 

आज वडिलोपार्जित धंद्यामध्ये विस्तार कराल. किर्ती प्रसिद्धीचे योग येतील. नवीन नोकरी लागू शकते. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. अपेक्षा पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धेत चांगले यश मिळू शकते. उद्योग व्यापारात कार्यक्षेत्र विस्तारेल. शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल आणि कठीण प्रसंगावर सहज मात कराल. रोजगारात स्वतःचे निर्णय महत्वपूर्ण राहतील. प्रियजनांची गाठभेट होईल.

मीनः 

आज कामाचे कौतूक होईल. व्यवसायात धाडसाचे काम कराल. आर्थिक आवक चांगली राहील. फिरायला जाण्याचे बेत ठरतील. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. 

Whats_app_banner