Lucky Zodiac Signs : प्रगतीचे मार्ग मोकळे होतील, मोठा आर्थिक लाभ होईल! या ५ राशींसाठी लकी गुरुवार
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : प्रगतीचे मार्ग मोकळे होतील, मोठा आर्थिक लाभ होईल! या ५ राशींसाठी लकी गुरुवार

Lucky Zodiac Signs : प्रगतीचे मार्ग मोकळे होतील, मोठा आर्थिक लाभ होईल! या ५ राशींसाठी लकी गुरुवार

Jul 25, 2024 07:26 AM IST

Lucky Rashi Bhavishya 25 July 2024 : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचवी तिथी असून या दिवशी गुरु मंगलयोगासह शोभन योग, शुक्रादित्य योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्राचा शुभ संयोग होत आहे. या ५ राशींसाठी लकी राहील आजचा गुरुवार.

लकी राशीभविष्य, नशीबवान राशी २५ जुलै २०२४
लकी राशीभविष्य, नशीबवान राशी २५ जुलै २०२४

आज २५ जुलै २०२४ गुरुवार रोजी, चंद्र कुंभ राशीनंतर मीन राशीत जाणार असून वृषभ राशीत गुरू आणि मंगळाचा संयोग गुरु मंगल योग निर्माण करत आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचवी तिथी असून या दिवशी गुरु मंगलयोगासह शोभन योग, शुक्रादित्य योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

मेष: 

आज कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. परदेशगमन खूप फायदेशीर ठरणार आहे. प्रसिद्धीचे योग येतील. आध्यात्मिक सुख उत्तम मिळेल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळेल. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. जुनी येणी वसूल होतील. मन प्रसन्न राहील.

मिथुन: 

आज वस्तु खरेदीस अनुकूल दिवस आहे. व्यवसायात इतरांबरोबर सौजन्य दाखवल्यामुळे तुम्हालाही सहकार्य मिळेल. जुनी येणी वसूल होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. इतरांची मने जिंकाल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. आत्म विश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. 

सिंह: 

आज अनुकुल स्थिती राहणार आहे. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर राहील. कलाकारांना चांगला वाव मिळेल. आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. 

तूळ: 

आज व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना राजाश्रय लाभेल. मानधनात वाढ होईल. संशोधन क्षेत्रातील मंडळीना मान सन्मान पदवी पुरस्कार मिळेल. आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. 

वृश्चिकः 

आज आर्थिक लाभ घडतील. प्रमोशन होण्याची शक्यता आहे. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. कामाचा दर्जा सुधारेल. विलक्षण छाप पडेल. व्यवसायात आपल्या मतांवर ठाम रहाणार आहात. आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. 

Whats_app_banner