Today lucky zodiac signs: गुरुपुष्यामृत योगात या ५ राशींचा बजेट सुधारेल, अपार लाभाचा दिवस
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs: गुरुपुष्यामृत योगात या ५ राशींचा बजेट सुधारेल, अपार लाभाचा दिवस

Today lucky zodiac signs: गुरुपुष्यामृत योगात या ५ राशींचा बजेट सुधारेल, अपार लाभाचा दिवस

Jan 25, 2024 11:19 AM IST

Lucky Rashi Today 25 january 2024: आज २५ जानेवारी २०२४ गुरुवार रोजी, ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोगात कोणत्या ५ राशींना नशीबाची साथ लाभेल, जाणून घ्या.

Lucky Rashi Today 25 january 2024
Lucky Rashi Today 25 january 2024

आज गुरुवार २५ जानेवारी रोजी, चंद्र स्वतःच्या कर्क राशीत भ्रमण करत आहे आणि या दिवशी गुरु पुष्य सारख्या महायोगाचा शुभ संयोग देखील होत आहे. तसेच, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे आणि ही तिथी शाकंभरी व पौष पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरु पुष्य योगासोबत प्रीति योग, अमृत सिद्धी योग, रवियोग आणि पुष्य नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने पौष पौर्णिमेच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात ५ राशींना अपार लाभ होणार आहे.

मेष: 

आज ग्रह-नक्षक्षाच्या शुभ योगात आर्थिक बाबतीत शुभ दिवस राहील. कष्ट केल्यामुळे समाजात मान-सन्मान मिळेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. देश-विदेशात फिरायला जाण्याचे योग निर्माण होतील. आपल्या आवडीनिवडी जोपासू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल व उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची साथ लाभेल. 

तूळ: 

आज गुरुपुष्यामृत योगात फायदेशीर घटना घडतील. धार्मिक स्थळी फिरायला जाण्याचे नियोजन कराल. तुमच्या नवीन कल्पनेचं स्वागत होईल. जुन्या मित्र-मैत्रिणींसोबत भेट घडेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. आपल्या तार्किक बुद्धीने प्रति स्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मनात उत्साह राहील. जोडीदारांकडून सहकार्य लागेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग वाढेल.

वृश्चिक: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात विद्यार्थ्यांना यश मिळेल. कुटुंबातीलच व्यक्ती तुमच्या फायद्याच्या ठरतील. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण होतील. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. घरात शुभ समाचार अथवा मंगलकार्य असा संयोग घडेल. सार्वजनिक सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. आज नवनवीन प्रोजेक्टसाठी अनुकूल दिवस आहे.

धनुः 

आजचा दिवस शुभ असेल. नोकरी व्यवसायात नवीन बदल लाभदायक राहील. प्रवासाचे योग आहेत. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. आपल्या शांतप्रिय स्वभाव आणि गुणवैशिष्ट्यामुळे पुरेपूर लाभ होईल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिवस आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशाचा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवन आनंदाचे राहील. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहील. 

मीनः 

आज शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या प्रकारे संशोधन करू शकता. अभ्यासात प्रगती होईल. खूप दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. देश-विदेशात फिरायला जाण्याचे योग आहेत. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. नविन संधी व प्रस्ताव येतील. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येईल. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील. आत्मविश्वास द्विगुणित राहील.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner