मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : गुरुप्रतिपदा आणि शुभ योग-संयोग या ५ राशींसाठी भाग्यदायक, लाभाचा दिवस

Today lucky zodiac signs : गुरुप्रतिपदा आणि शुभ योग-संयोग या ५ राशींसाठी भाग्यदायक, लाभाचा दिवस

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 25, 2024 11:06 AM IST

Lucky Rashi Today 25 february 2024 : आज २५ फेब्रुवारी २०२४ रविवार रोजी, ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात या ५ राशींसाठी भाग्यदायक दिवस.

lucky zodiac signs today 25 february 2024
lucky zodiac signs today 25 february 2024

आज रविवार २५ फेब्रुवारी रोजी चंद्र सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी असून या दिवशी सुकर्म योग, त्रिपुष्कर योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज तयार झालेल्या शुभ योग-संयोगाचा फायदा होणार आहे.

मेषः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात दिवस फलदायी ठरेल. आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मौजमजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. यशस्वी व्हाल. आर्थिक ताण संपेल. मन सकारात्मक राहील. प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगतीकारक दिनमान आहे. आपला नावलौकिक वाढेल. नवीन योजना आखाल. परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. पूर्वी केलेल्या कामातून मोठे लाभ होऊ शकतात.

कर्क: 

आज मान-सन्मान मिळण्याचे योग आहेत. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्त्रोत वाढतील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. कुंटुंबात सुख-समाधानाचे वातावरण राहील.

सिंहः 

आज आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. अशावेळी शांत राहणे श्रेयस्कर ठरेल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत पण तुमच्या मुडी स्वभावामुळे प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल.

कुंभः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. सद्गुरूंचा वरदहस्त राहील. तुमच्यातील सद्गुणांची लोक कदर करतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. आत्मविश्वासाने पुढे जाल. अध्यापनामध्ये विशेष गोडी घ्याल. सुखद बातम्या मिळतील. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. मन समाधानी राहील. घरासंबंधी समस्या दूर होतील. मन प्रसन्न राहील.

मीनः 

आज ग्रहयोग उत्तम आहे. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पाहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. मोठा आर्थिक लाभ होईल. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून, आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक प्रगतीचा दिवस ठरेल. 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

 

WhatsApp channel