Lucky Zodiac Signs : उत्पन्नात वाढ होईल, परदेशात शिक्षणाची संधी! या ५ राशींसाठी लकी रविवार-lucky zodiac signs today 25 august 2024 astrology predictions for mithun kark tula vrishchik kumbh rashi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : उत्पन्नात वाढ होईल, परदेशात शिक्षणाची संधी! या ५ राशींसाठी लकी रविवार

Lucky Zodiac Signs : उत्पन्नात वाढ होईल, परदेशात शिक्षणाची संधी! या ५ राशींसाठी लकी रविवार

Aug 25, 2024 09:53 AM IST

Lucky Rashi Bhavishya 25 August 2024 : आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. या दिवशी भानुसप्तमी असून, ध्रुव योग, रवि योग आणि भरणी नक्षत्राचा शुभ योग होत आहे. या ५ राशींना रविवारचा दिवस लकी राहील.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २५ ऑगस्ट २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २५ ऑगस्ट २०२४

आज रविवार २५ ऑगस्ट रोजी, चंद्र मेष राशीनंतर वृषभ राशीत जाणार आहे आणि चंद्रापासून पुढील राशीत शुभ ग्रह उपस्थित आहेत म्हणजेच गुरु वृषभ राशीत आहे, त्यामुळे सुनफा योग तयार होत आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. या दिवशी भानुसप्तमी असून, ध्रुव योग, रवि योग आणि भरणी नक्षत्राचा शुभ योग होत असल्यामुळे दिवसाचे महत्व अधिकच वाढले आहे. या शुभ योगाचा ५ राशीच्या लोकांना लाभ मिळेल.

मिथुनः 

आज तुमच्या रसिकतेला उधाण येईल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. मनासारख्या घटना घडतील. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून, आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. कामाचे उत्तम नियोजन करणार आहात. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. 

कर्कः 

आज गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. अंगीभूत गुणासाठी चांगले वातावरण राहील. वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. नावलौकिक वाढेल. 

तूळ: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. 

वृश्चिकः 

आज गृहसौख्यात भर पडेल. खरेदी आणि शुभ कामासाठी दिवस मंगलमय आहे. काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन योजनेची सुरुवात कराल. लोकप्रियता समाजकारणाची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखक वर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मान सन्मान मिळेल. 

कुंभः 

आज कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. अनेक अडचणी सोडवाल. सगळ्यावर मात कराल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. धाडसी निर्णय घ्याल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहील.