Lucky Zodiac Signs : सुखी व्हाल; रोजगाराची संधी मिळेल! या ५ लकी राशींना आर्थिक फायदा होईल
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : सुखी व्हाल; रोजगाराची संधी मिळेल! या ५ लकी राशींना आर्थिक फायदा होईल

Lucky Zodiac Signs : सुखी व्हाल; रोजगाराची संधी मिळेल! या ५ लकी राशींना आर्थिक फायदा होईल

Updated Sep 24, 2024 09:37 AM IST

Lucky Rashi Bhavishya 24 September 2024 : आज भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असून, पितृ पक्षाच्या आठव्या श्राद्धाच्या दिवशी वरियान योग, द्विपुष्कर योग आणि मृगाशिरा नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे, आजचा दिवस या ५ राशीच्या लोकांसाठी लकी आहे.

लकी राशीभविष्य, नशीबवान राशी २४ सप्टेंबर २०२४
लकी राशीभविष्य, नशीबवान राशी २४ सप्टेंबर २०२४

आज मंगळवार २४ सप्टेंबर रोजी, चंद्र वृषभ राशीनंतर मिथुन राशीत जाणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असून, या तिथीला अष्टमी तिथीचे श्राद्ध केले जाईल. 

श्राद्ध पक्षाच्या आठव्या दिवशी वरियान योग, द्विपुष्कर योग आणि मृगाशिरा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे.

मेषः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात सगळीकडे धडाडी दाखवाल. गृहस्थी सौख्य लाभेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. कामात कौशल्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. आर्थिक नियोजन उत्तम प्रकारे कराल. लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. व्यवहार लाभदायक ठरतील. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. आज यश निश्चित मिळेल. सहकार्य लाभणार आहे. व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. 

कन्याः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. आर्थिक फायदा होईल. शुभ कार्यात सहभागी व्हाल. प्रयत्नाच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रवासातुन लाभ मिळवाल. यश मिळेल.

वृश्चिकः 

आज नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. भरभराटीचा दिवस आहे. यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभेल. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहील. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. 

कुंभः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात यश मिळेल. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. आनंद अधिकच दुणावेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. व्यापारी वर्गाकरीता महत्वाचा योग आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. नोकरदारांना बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. संधीचं सोनं कराल.

मीनः 

आज गुंतवणूक फायदेशीर ठरेल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. इच्छित फळ मिळणार आहे. परिवारात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. व्यापारात परिस्थिती चांगली राहील. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून, वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. आत्मविश्वास द्विगुणित होईल. सुखी व्हाल.

Whats_app_banner