Lucky Zodiac Signs : आज गुरुपुष्यामृत योग फळणार! या ५ लकी राशींची होणार चांदी, होणार आनंदीआनंद
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : आज गुरुपुष्यामृत योग फळणार! या ५ लकी राशींची होणार चांदी, होणार आनंदीआनंद

Lucky Zodiac Signs : आज गुरुपुष्यामृत योग फळणार! या ५ लकी राशींची होणार चांदी, होणार आनंदीआनंद

Oct 24, 2024 01:38 AM IST

Lucky Rashi Bhavishya 24 October 2024 : आज कार्तिक कृष्ण अष्टमी. आजच्या अष्टमीला अहोई अष्टमी म्हणूनही ओळख आहे. तसेच आज गुरुपुष्यामृत योग देखील आहे. तसेच आज चंद्र मिथुन राशीमध्ये आहे, तर सूर्य तुळ राशीत आहे.

आज गुरुपुष्यामृत योग फळणार! या ५ लकी राशींची होणार चांदी, येणार आनंद
आज गुरुपुष्यामृत योग फळणार! या ५ लकी राशींची होणार चांदी, येणार आनंद

आज गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी, चंद्र मिथुन राशीत आहे. आजच्या तिथीला गुरुपुष्यामृत योगही बनत आङे. तसेच आज अहोई अष्टमी देखील आहे. अशात या पाच राशींच्या जातकांचे जीवन आज उजळणार आहे. या ५ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदीआनंद घेऊन येत आहे.

 

कर्क

आज कार्यालयात तुमची वाहवा होईल. त्यामुळे तुम्ही चर्चेत राहाल. आज प्रेमीजीवन चांगले जाईल. प्रियकराकडून खूप प्रेम आणि पाठिंबा मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कार्यालयात तुमची चांगली प्रतिमा टिकून राहील. मेहनतीचे फळ मिळेल. करिअरमध्ये अफाट यश मिळेल. 

कन्या

आज कन्या राशीच्या लोकांना व्यावसायिक जीवनात मोठे यश मिळेल. काही जातक जवळचे मित्र किंवा प्रियजनांसह सुट्टीचा आनंद घेऊ शकतात. कुटुंबात सुख-शांती राहील. शैक्षणिक कार्यात अपार यश मिळेल. आज तुम्हाला अल्पकालीन दीर्घकालीन गुंतवणुकीच्या पर्यायांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. 

मकर

मकर राशीसाठी आजचा दिवस सामान्य राहील. सुखद प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होतील. नोकरदारांच्या बदल्या होऊ शकतात. काही जातकांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता भासू शकते. शैक्षणिक कामात आव्हानांना सामोरे जावे लागेल. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कामातील अडथळे दूर होतील.

कुंभ

आज कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रियजनांना भेटण्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तुमची सर्व कामे यशस्वी होतील. व्यवसायात फायदा होईल. जुन्या मित्रांची मोठ्या काळानंतर भेट होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. यामुळे नात्यांमध्ये प्रेम आणि रोमान्स वाढेल.

मीन

आज मीन राशीच्या लोकांना आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. धार्मिक स्थळी जाण्याचे योग येतील. काही जातकांना वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा मिळण्याची शक्यता आहे. प्रेमजीवनात प्रेम आणि रोमान्स वाढेल. 

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner