आज शुक्रवार २४ मे २०२४ रोजी शुक्र गुरुसोबत युती करत आहे. या युतीमुळे गजलक्ष्मी योग घटित होत आहे. सोबत आज चंद्रभ्रमणामुळे नवपंचम योगाची निर्मिती होत आहे. आज शिव आणि सिद्ध योगसुद्धा आहे. अशा शुभ योगांचा काही राशींवर अतिशय शुभ प्रभाव पडणार आहे. पाहूया आजच्या या पाच लकी राशी कोणत्या आहेत.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. आज चंद्रबल उत्तम असल्याने बाहेर फिरायला जायचे नियोजन कराल. विवाहित लोकांचे कौटुंबिक वातावरण आनंददायक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या नव्या कल्पनांचे स्वागत होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कार्यप्रणाली व कल्पना शक्ती यात सुधारणा होईल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपल्या अनुभवापेक्षा मोठी जबाबदारी स्विकारू नये. आरोग्य आणि मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याबाबत काळजी घ्या.कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग फायद्यात राहतील. सार्वजनिक कामात तुमची लौकिकता वाढेल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी असणार आहे. व्यावसायिकांना व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग जुळून येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरीत आर्थिकबाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहिल. सर्वच क्षेत्रातील लोकांना धनलाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ कराल. तुमच्या दमदार वक्तृत्वाचा प्रभाव इतरांवर राहील. समाजात तुमचा मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल.आकस्मिक लाभाचा योग आहे. खर्च काही प्रमाणात वाढतील. मात्र कमाईसुद्धा तशी असल्याने सर्वकाही निभावून जाईल. मनःशांती लाभेल. संध्याकाळच्या वेळी मित्रांच्या गाठीभेटी जुळून येतील.
आज नवपंचम योगातील चंद्रबल पाहता आपल्याला कार्यात यश मिळेल. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. लेखकांच्या लिखाणाला उत्तेजन मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल. भाग्योदयकारक दिनमान आहे. आज आपणास नशीबाची साथ लाभणार आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. व्यवहार कुशलतेमुळे आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तुतीस पात्र ठराल. परमेश्वरवर विश्वास दृढ होईल. मानसिक स्वास्थ लाभेल.
आज मकर राशीसाठी चंद्रबल उत्तम असल्याने उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस आहे. प्रेमवीरांनी आपले प्रेम आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करण्यास चांगला दिवस आहे. व्यवसायात तुम्ही केलेल्या नियोजनामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. अवखळ मनाला विवेकाचे लगाम घालावे लागतील. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळाल्यामुळे कामाची गती वाढेल. शासकीय सेवेतील मंडळीना देखील उत्तम दिनमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. जमिनीसंबंधित रखडलेली कामे पूर्णत्वास जातील. विरोधक आक्रमक होतील त्यांचा वेळीच बिमोड कराल तर यशस्वी व्हाल.
आज शिव आणि सिद्ध योगात कुटुंबातील लोकांचा पाठिंबा मिळेल. व्यापारात परिस्थितीवर मात कराल. विनाकारण खर्च करणे टाळा. उद्योग व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत उच्च पदावर नियुक्ती होईल. नवीन वाहन खरेदीचा योग आहे. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. कुटुंबातील सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल. मनावरचा ताण बर्यापैकी कमी झालेला असेल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा योग येईल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचे चांगले सहकार्य मिळणार आहे. त्यांच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चित शक्य होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढा राहील.
संबंधित बातम्या