आज सोमवार २४ जून २०२४ रोजी, चंद्र शनीच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे गुरु आणि चंद्र यांच्यामध्ये नवमपंचम योग तयार होत आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी असून, या दिवशी ऐन्द्र योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि उत्तराषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशीच्या लोकांना शुभ योग तयार होत असल्याचा फायदा होईल. जाणून घ्या सोमवारच्या लकी राशी.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात दिनमान समाधानकारक सिंद्ध होईल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. आर्थिक वृद्धी होईल. देश-विदेश फिरण्याचे योग आहेत. आनंदी व ऊत्साही राहणार आहात.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात वैवाहिक जीवनात अचानक काही घटना घडू शकतात. अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. परदेशाशी व्यवहार असणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. संधी प्राप्त होतील. मोठी पदप्राप्ती, मान-सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. मित्रमंडळींचे व कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घेण्यात तुम्ही पुढे असाल आणि त्यामुळे घरातील वातावरणही आनंदी राहील. आर्थिक पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना राबवाल. वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन लाभेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात लाभ होईल. व्यवसायात इतरांबरोबर काम केल्यामुळे तुम्हाला सहकार्यही मिळेल. जुनी येणी वसूल होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. आत्मविश्वास वाढल्याने मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात आपल्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. मुलांकडुन समाधान मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर सिद्ध होईल. कलाकारांना चांगला वाव मिळेल. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल.