आज २३ जुलै २०२४ रोजी, चंद्र शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया व चतुर्थी तिथी असून, या दिवशी सौभाग्य योग, शोभन योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज संकष्ट चतुर्थीला होणाऱ्या शुभ योगात लाभ होईल.
आज आर्थिक सहकार्य लाभेल. दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे रहाल. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. मोठे यश लाभेल. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. नवीन व्यवसायिक प्रस्ताव येतील. कौटुंबिक सुखशांती राहील, आनंददायक वातावरण राहील.
आज मनोधैर्य तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. जनमानसात प्रभाव पाडाल. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. रोजगारात मनासारखी बढती व बदली होण्याची शक्यता आहे. समस्या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहील. आंनदाची बातमी मिळेल.
आज आत्मविश्वास वाढेल. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. खेळाच्या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील.
आज कलेत हाती घेतलेल्या कामात यशस्वी रहाल. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. व्यवसायात खूप काम कराल आणि त्याचा लाभही तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आनंदी उत्साही राहाल. नोकरीत बढती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. कामात केलेली धावपळ फायदेशीर राहील.
आज व्यापारात वाढ होवुन अनुकुल स्थिती राहणार आहे. नोकरी धंद्याच्या ठिकाणच्या आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल. संवाद वाढेल. मनात उर्जा निर्माण करणारा दिवस आहे. रोजगारात आर्थिक लाभ होईल. वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून कामाला लागा. घर वाहन खरेदीचा योग आहे. आपली स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक सामंजस्य राहील.
संबंधित बातम्या