मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs: लक्ष्मीनारायण योगाचा ५ राशींना होईल लाभ, मिळणार मोठं यश

Today lucky zodiac signs: लक्ष्मीनारायण योगाचा ५ राशींना होईल लाभ, मिळणार मोठं यश

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 24, 2024 12:15 PM IST

Lucky Rashi Today 24 january 2024: आज ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोगात कोणत्या ५ राशींना भाग्याची साथ लाभेल.जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

Lucky Rashi Today 24 january 2024
Lucky Rashi Today 24 january 2024

आज, बुधवार, २४ जानेवारी रोजी मिथुन राशीनंतर चंद्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी असून या दिवशी रवियोग, लक्ष्मी नारायण योग आणि पुनर्वसु नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. आज शुभ योग तयार होत असल्याने या संयोगाचा ५ राशींना फायदा होणार आहे.

मेष: 

आज ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोग लाभदायक राहील. लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील. वैवाहिक जीवनात घरातील वातावरण आनंदी राहील. नोकरी व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. सार्वजनिक कामात नावलौकिक वाढेल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. 

वृषभ: 

आज ग्रह-नक्षत्राचा बदल फलदायी ठरणार आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनचे योग आहेत. व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्याल. उधारी वसूल होईल. व्यवसायात आवश्यक ते बदल करण्याच्या संधी मिळतील. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईक व मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ योग आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. 

कर्कः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ स्थितीत आर्थिक प्रगती होईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय नोकरी या संदर्भातील कामे लवकर घडून येतील. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. बेकारांना नवीन नोकरी लागण्याची संधी उपलब्ध होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील, समाधान लाभेल. 

तूळ: 

आज कुटुंबातील लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. व्यापारात परिस्थितीवर मात कराल. उद्योग व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत मानाच्या जागा मिळतील. नवीन वाहन खरेदीचे योग आहे. मनावरचा ताण बर्‍यापैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे. त्यांच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चित शक्य होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. कुटुंबातील सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल.

वृश्चिक: 

आज कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. धाडस आणि कामाचा उरक चांगला राहील. परदेशाशी व्यवहार असणाऱ्यांना फायदेशीर ठरेल. करिअरमध्ये एखादी गोष्ट करण्याचा निर्धार आणि निश्चयीपणाच्या जोरावर बाजी मारून न्याल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात शुभवार्ता मिळेल.