Lucky Horoscope in Marathi: सोमवार, दिनांक २४ फेब्रुवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची कृष्ण पक्षाची एकादशी ही तिथी आहे. आज पूर्वाषाढा नक्षत्राचा योग आहे. तर चंद्र मकर राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. २२ फेब्रुवारी २०२५ या दिवसासाठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, वृषभ, सिंह, वृश्चिक, मकर.
२४ फेब्रुवारी हा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा दिवस फायदेशीर ठरेल. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम करत असाल तर त्यात यश मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ राशीच्या लोकांना या दिवशी आर्थिक लाभ होऊ शकतो. . नोकरी आणि व्यवसायातही प्रगतीचे संकेत आहेत. जवळच्या व्यक्तीकडून एखादी सरप्राईझ गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मन आनंदी राहील. जुने उधार घेतलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो
करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने सिंह राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप चांगला असेल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. समाजात तुमची ओळख वाढेल आणि तुम्हाला आदर मिळेल. नवीन योजनांवर काम करण्याची ही योग्य वेळ आहे. जर तुम्हाला कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर यश मिळण्याची शक्यता जास्त आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप खास असेल. कौटुंबिक जीवनही आनंददायी असेल आणि काही चांगल्या बातम्यांमुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुमच्या प्रतिभेचे कौतुक होईल. तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते, जी तुमच्या करिअरला पुढे नेण्यास मदत करेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगली संधी मिळू शकते.
मकर राशीच्या लोकांसाठी २४ फेब्रुवारी हा दिवस आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा दिवस चांगला असेल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही मोठ्या गुंतवणुकीची योजना आखत असाल तर ही योग्य वेळ असू शकते. घरात आणि कुटुंबात आनंद राहील आणि तुम्हाला तुमच्या प्रियजनांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या