मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : लक्ष्मी कृपेने या राशींवर होणार पैशांचा पाऊस! पाहा आजच्या ५ लकी राशी

Lucky Zodiac Signs : लक्ष्मी कृपेने या राशींवर होणार पैशांचा पाऊस! पाहा आजच्या ५ लकी राशी

May 23, 2024 11:26 AM IST

Lucky Rashi Bhavishya 23 May 2024 : आज वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा, कूर्म जयंती असे अनेक शुभ योग एकत्र आले आहेत. या सर्व योगांमध्ये कोणत्या राशींवर शुभ प्रभाव पडणार ते पाहूया.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २३ मे २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २३ मे २०२४

आज सर्वत्र बुद्धपौर्णिमा साजरी केली जात आहे. परंतु अनेकांना ज्ञात नसेल की, वैशाख पौर्णिमेलाच बुद्ध पौर्णिमा म्हटले जाते. कारण आजच्याच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता. त्यामुळे शास्त्रात या दिवसाला दुहेरी महत्व प्राप्त आहे. आजच्या या शुभ दिवसाचा प्रभाव राशींवरसुद्धा दिसून येत आहे. आज गुरुवारच्या दिवशी कोणत्या पाच राशी नशीबवान ठरल्या आहेत ते आपण राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तरुणांना मनासारखा जोडीदार मिळेल. नोकरीच्या कामामध्ये येत असलेल्या शंकाचे निरसन झाल्याने प्रगतीचा वेग वाढेल. कामानिमित्त परदेशी जाण्याचा योग जुळून येईल. यामध्येसुद्धा आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. कामे वेळेत पूर्ण होतील मात्र पैसे मिळण्यात थोडा धीर धरावा लागेल. घरामध्ये महागड्या शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी असणार आहे. एखाद्या महत्वाच्या गोष्टीत जोडीदाराचा सल्ला घेणे अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. विरोधकांचे डाव तुम्ही उधळून लावाल. तुमच्या विवेक बुद्धीमुळे हितशत्रूंना वेळीच चपराक बसेल. इतरांच्या वर्तवणुकीत सुधारणा करण्यासाठी धडपड कराल. आज धार्मिक गोष्टींमध्ये तुमचा स्वारस्य वाढेल. त्यामुळे हातातून अध्यात्मिक गोष्टी घडून येतील. दिवसभर मन प्रसन्न राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होईल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. व्यवसायात स्पर्धात्मक स्थिती लक्षात घेऊन नव्या योजना तयार कराव्या लागतील. त्यातून भविष्यात लाभ नक्कीच होणार.

सिंह

सिंह राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. उद्योग-व्यवसायात योग्य आणि योजनापूर्वक कार्य केल्यास मोठा आर्थिक फायदा संभवतो. शासकीय संबंधी एखादे काम मिळण्याच्या स्थितीत असेल तर जाणकार लोकांच्या मदतीने काम त्वरित होईल. रेंगाळलेली महत्वाची कामे अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचतील. जमीन विक्रीच्या कामातून आर्थिक फायदा मिळणार आहे. आता केलेली गुंतवणूक भविष्यात उपयोगी पडणार आहे. क्रीडा क्षेत्रातील लोकांना स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी प्राप्त होईल. कला कारांना आपली कला सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळेल. एकंदरीत सिंह राशीच्या लोकांवर आज शुभ योगांचा शुभ प्रभाव असणार आहे.

कन्या

कन्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. नव्याने व्यवसायात आलेल्या लोकांना प्रगतीचा कानमंत्र गवसणार आहे. मात्र गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी कामाच्या ठिकाणी थोडा बदल आवश्यक आहे. अनेक दिवसांपासून सरकारी कारणाने रखडलेली कामे आज पूर्ण होतील. त्यामुळे मनावरचा ताण नाहीसा होईल. विद्यार्थ्यंना शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्यास दिनमान अनुकूल असणार आहे. बौद्धिकतेच्या जोरावर लोकांना प्रभावी करण्यात यशस्वी व्हाल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज गुरुवारचा दिवस खास असणार आहे. आज घरामध्ये शुभ कार्य घडून येईल. विवाह करण्याच्या विचारात असलेल्या लोकांची विवाह जुळून येतील. त्यामुळे घरात आपसूकच आनंदी वातावरण होईल. आरामदायी आयुष्य जगण्यासाठी धडपड कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कलागुणांनी वरिष्ठ प्रभावित होतील. जुन्या मित्र-मैत्रिणीच्या गाठीभेटी जुळून येतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. मित्रांच्या सानिध्यात वेळ चांगला जाईल.

WhatsApp channel