आज शनिवार २३ मार्च रोजी, चंद्राचे सिंह राशीत संक्रमण झाले आहे. तसेच आज फाल्गुन मासातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी असून या दिवशी रवियोग, धन लक्ष्मी योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होणार आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे.
आज सौभाग्य योगात वृद्धी होईल. जुने कर्ज परत मिळेल. कर्ज मंजूर होईल. विवाह जुळतील. भावंडाची योग्य साथ मिळेल. नविन संधी आपल्याला मिळणार आहे. आर्थिक बाबतीतील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. यशस्वी व्हाल. नवीन संधी मिळेल व मानधनात वाढ होईल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल.
आज प्रगतीकारक ग्रहमान आहेत. आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. आनंददायी आहे. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. पद प्रतिष्ठा लाभेल. संततीकडून समाधान लाभेल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. धन संचय करा. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. आज यश निश्चित लाभेल. सहकार्य लाभेल. आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात दिनमान उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. बढतीचे योग आहेत. आत्मविशास वाढेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. जोडीदारांकडून साथ लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील.
आज अपेक्षीत व्यवहार योग्यरित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती उत्तम होईल. कुटुंबामधून आपणास सुवर्ता मिळणार आहे. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संतती विषयी चिंता मिटेल. जमीन खरेदी विक्रीतून अधिक लाभ होईल.