Lucky Zodiac Signs : व्यवसायात जम बसेल, आर्थिक लाभ होईल! 'या' ५ राशीच्या लोकांना दिवस ठरेल लकी
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : व्यवसायात जम बसेल, आर्थिक लाभ होईल! 'या' ५ राशीच्या लोकांना दिवस ठरेल लकी

Lucky Zodiac Signs : व्यवसायात जम बसेल, आर्थिक लाभ होईल! 'या' ५ राशीच्या लोकांना दिवस ठरेल लकी

Published Jun 23, 2024 04:00 AM IST

Lucky Rashi Bhavishya 23 June 2024 : आज दिवशी ब्रह्मयोग, त्रिपुष्कर योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पूर्वाषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. अशात आजचा रविवारचा दिवस या ५ राशींना लकी ठरेल.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २३ जून २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २३ जून २०२४

आज रविवार २३ जून २०२४ रोजी, चंद्र धनु राशीनंतर मकर राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी ब्रह्मयोग, त्रिपुष्कर योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पूर्वाषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज तयार होत असलेला शुभ योग या ५ राशींना फायदेशीर ठरणार आहे. जाणून घ्या आजच्या लकी राशी कोणत्या आहेत.

मेष: 

आज उत्तम ग्रहयोग आहे. प्रेमप्रकरणात यश येईल. संशोधन क्षेत्रात काम करणारांची प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. 

मिथुन: 

आज व्यापारात उत्पन्न वाढेल. समाजात मान मिळेल. नवे मार्ग आपणास सापडतील. लांबचे प्रवास आनंददायक होतील. प्रसिद्धीही मिळेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहील. कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. 

कर्क: 

आज कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. नावलौकिक वाढेल. तरुणांच्या आवडी निवडी बदलत राहतील. मनाप्रमाणे खरेदी कराल. व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. बेरोजगारांना नोकरी मिळेल. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. 

तूळ: 

आज कामे मार्गी लागतील. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेम प्रकरणामध्ये यश येईल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्रमैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. गृहसौख्य उत्तम आहे. 

मीन: 

आज आर्थिक घडी बसेल. पैसा खर्च करावा लागेल. कलाकरांना संधी मिळतील. यशाची जबरदस्त आसक्ती तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जमिनीसंबधीत रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील. 

Whats_app_banner