Lucky Zodiac Signs : वरिष्ठ पदावर बढती मिळेल, अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळेल! या ५ राशींसाठी लकी दिवस
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : वरिष्ठ पदावर बढती मिळेल, अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळेल! या ५ राशींसाठी लकी दिवस

Lucky Zodiac Signs : वरिष्ठ पदावर बढती मिळेल, अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळेल! या ५ राशींसाठी लकी दिवस

Updated Jul 23, 2024 07:01 AM IST

Lucky Rashi Bhavishya 23 July 2024 : आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची दुसरी तिथी असून, या तिथीला आयुष्मान योग, द्विपुष्कर योग, सौभाग्य योग आणि धनिष्ठा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. या ५ राशींसाठी लकी राहील आजचा मंगळवार.

लकी राशीभविष्य २३ जुलै २०२४
लकी राशीभविष्य २३ जुलै २०२४

आज २२ जुलै २०२४ रोजी, चंद्र मकर राशीनंतर कुंभ राशीत जाणार आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची दुसरी तिथी असून, या तिथीला आयुष्मान योग, द्विपुष्कर योग, सौभाग्य योग आणि धनिष्ठा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे, त्यामुळे दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज शुभ योग तयार होत असल्याने ५ राशींना फायदा होणार आहे.

मेष: 

आज मानसिक अवस्था उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. स्थावर इस्टेटीसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभराटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. 

वृषभः 

आज जुनी येणी वसूल होतील. एखादी गोष्ट धडाडीने करण्यात तुमचा पुढाकार राहील. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय नोकरदारासाठी यशस्वी दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. 

सिंह: 

आज कलाकारांना चांगला वाव मिळेल. दुसऱ्याला सहकार्य करण्यात तत्पर राहाल. तुमच्यातील गुण समाजासमोर आल्यामुळे लोकांची दाद चांगली मिळेल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल.

कन्या: 

आज वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्याल. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. नोकरी व्यवसायात कष्टाची बाजी लावाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल.

तूळ: 

आज राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. घरातील मोठ्या माणसांचा वरदहस्त राहील. तुमचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरेल. आपापल्या क्षेत्रात प्रचंड झेप घ्याल. तरुण वर्गाला आपली आवडती व्यक्ती वारंवार भेटेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद, मानसन्मान व प्रसिद्धी मिळेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. 

Whats_app_banner