मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs: भौमप्रदोषचा दिवस या ५ राशींसाठी मंगलमय, पदोन्नती व प्रगतीचे शुभ योग

Today lucky zodiac signs: भौमप्रदोषचा दिवस या ५ राशींसाठी मंगलमय, पदोन्नती व प्रगतीचे शुभ योग

Jan 23, 2024 12:00 PM IST

Lucky Rashi Today 23 january 2024: आज ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोगात काही राशींना पदोन्नती व प्रगतीचे शुभ योग आहेत, जाणून घ्या कोणत्या ५ राशींना नशीबाची साथ लाभेल.

Today Lucky zodiac signs
Today Lucky zodiac signs

आज मंगळवार २३ जानेवारी रोजी, चंद्र बुधच्या मिथुन राशीत भ्रमण करत असून मंगळ आणि चंद्राच्या समसप्तक योगामुळे लक्ष्मी योगही तयार होत आहे. याशिवाय आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून, भौमप्रदोष व्रत आहे. या दिवशी आंद्र योग, रवियोग आणि आर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. आजच्या ग्रह-नक्षत्राचां शुभ संयोग कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरेल, जाणून घ्या या ५ नशीबवान राशी कोणत्या आहेत.

मिथुन: 

आज ग्रह-नक्षत्राचा शुभ योगात आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. बचत करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान-सन्मान वाढेल. ध्येय निश्चित करा. आज यश निश्चित लाभेल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. देश-विदेश फिरण्याचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडेल. पोलिस सैन्यातील व्यक्तींकरीता पदप्राप्तीचा दिवस आहे. कौटुंबिक सुख लाभेल.

कर्कः 

आज अंत्यत शुभ दिवस आहे. व्यापाऱ्यांना सुख-समृद्धी लाभेल. मेहनतीमुळे उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात ओळख मिळवाल आणि प्रोत्साहन लाभेल. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. बढतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय, सामाजिक व कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिवस आहे. मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. उधारी वसुल होईल. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास लाभदायक होईल.

सिंह: 

आज ग्रह-नक्षत्राच्या स्थितीत दिवस उत्तम राहील. वडिलधाऱ्यांकडून आर्थिक लाभ होतील. नोकरीत बढतीचे योग आहेत. आपला आत्मविशास वाढेल. मान-सन्मान मिळेल. नवीन योजना कराल. आपल्या कल्पनांना सहकाऱ्यांकडून साथ लाभेल. मित्रमैत्रिणी व नातेवाईकांकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात चित्त लागेल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्म-समाधान मिळेल. आनंददायी वातावरण राहील. आकस्मिक धनलाभ होईल.

कन्या: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात आर्थिक स्थिती उत्तम होईल. सोबतच आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम असाल. सामाजिक उत्सवात सहभाग घ्याल, यामुळे प्रभावशाली व्यक्तींसोबत संपर्क वाढतील. आपल्या वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. अपेक्षीत व्यवहार सुरळीत होतील. व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संतती विषयी चिंता मिटेल. जमीन खरेदी विक्रीतून अधिक लाभ होईल. कुटुंबाकडून आनंदाची बातमी मिळेल.

कुंभ: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात नवीन कामकाज सुरु करण्यासाठी अनुकूल काळ आहे. ठोस निर्णय घेऊ शकाल. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल. आर्थिक वृद्धी मिळेल. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. पद-प्रतिष्ठा लाभेल. संततीकडून समाधान सुख लाभेल.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel