मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : शुभ योग-संयोगात आजचा दिवस बक्कळ लाभाचा, या ५ राशींचे नशीब चमकेल

Today lucky zodiac signs : शुभ योग-संयोगात आजचा दिवस बक्कळ लाभाचा, या ५ राशींचे नशीब चमकेल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 23, 2024 07:00 AM IST

Lucky Rashi Today 23 february 2024: आज २३ फेब्रुवारी २०२४ शुक्रवार रोजी, ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात या ५ राशींचे नशीब चमकेल.

lucky zodiac signs today 23 february 2024
lucky zodiac signs today 23 february 2024

आज शुक्रवार २३ फेब्रुवारी रोजी चंद्र कर्क राशीनंतर सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून या दिवशी रवियोग, पुष्य योग, शोभन योग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना या शुभ योगाचा लाभ मिळणार आहे.

मेषः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात आत्मविश्वासामुळे कामाचा दर्जा सुधारेल. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. विवाह इच्छूकांना आपला जोडीदार निवडण्याची संधी मिळेल. कला आणि बुद्धी यांचा संगम होऊन खूप चांगल्या कलाकृती तयार कराल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. गुंतवणूक लाभदायक ठरेल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन व घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील.

मिथुनः 

आज दिवस लाभदायक ठरणार आहे. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. देवधर्म पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल. आर्थिक प्रगती होईल.

कन्याः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात लाभ होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठांची मर्जी झाल्यामुळे प्रमोशनही मिळू शकते. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव-नविन संधी मिळणार आहेत. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास वाव मिळेल. वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल.

तूळ: 

आज वेगवेगळ्या संधी मिळतील. घरातील वातावरण सुधारेल. नोकरीत अधिकार मिळेल. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल.

वृश्चिकः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगाचा फायदा होईल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. महत्त्वाचे निर्णय लवकर घ्यावेत. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग येतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. उत्पन्नात वाढ होईल. यशाचा आनंद घेता येईल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)