आज शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी, चंद्र मीन राशीनंतर मेष राशीत जाणार असून कन्या राशीत सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे शुक्रादित्य योग तयार होत आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून या दिवशी शुक्रादित्य योगासह अमृत सिद्धी योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.
आज भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल. अडलेली कामे पूर्ण होतील. कामाची गती वाढून फायदा होईल. नवीन योजना भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. व्यापार चांगला चालेल. आईवडिलांशी असलेले संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढेल. कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कामाचा निश्चितच लाभ होणार असून आर्थिक आवक वाढणार आहे.
आज कामात उत्साह वाढणार आहे. जबाबदारीत वाढ होईल. व्यापारात आर्थिक फायदा होईल. दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नका. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. वेगवेगळ्या संधी मिळतील. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे रहातील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. कार्यक्षेत्रात यश मिळेल. महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होतील.
आज मुलांकडून समाधान लाभेल. आर्थिक लाभ होतील. व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घडतील. ज्यांच्या भविष्यात फायदा होणार आहे. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. कामाच्या ठिकाणी योग्य तेथे कर्तव्य निभावाल. कार्यक्षेत्रात वेळेचा चांगला सदुपयोग करून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. कार्यक्षेत्रात प्रगतीकारक दिनमान आहे.
आज किर्ती प्रसिद्धीचे योग येतील. नवीन नोकरी लागू शकते. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. वडिलोपार्जित धंद्यामध्ये वाढ कराल. विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धेत चांगले यश मिळू शकते. घरामध्ये छोट्या समारंभाच्या निमित्ताने प्रियजनांची गाठभेट होईल. उद्योग व्यापारात कार्यक्षेत्र विस्तारेल. आत्मविश्वास वाढल्याने कठीण पेचप्रसंगावर सहज मात कराल. रोजगारात स्वतःचे निर्णय महत्वपूर्ण राहतील. व्यापार रोजगार चांगला चालेल.
आज व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. धाडस कराल. आर्थिक आवक चांगली राहील. फिरायला जाण्याचे बेत ठरतील. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. संशोधनात्मक कार्य प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. कामाचे कौतुक होईल. वातावरण उत्साहवर्धक राहील. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील.