आज रविवार २२ सप्टेंबर रोजी, चंद्राचे शुक्रच्या वृषभ राशीत भ्रमण होणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असून या तिथीला पंचमी तिथीचे श्राद्ध केले जाते.
श्राद्ध पक्षाच्या पाचव्या दिवशी हर्षण योग, रवियोग आणि कृतिका नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे.
आज मंगलमय दिवस आहे. गृहसौख्यात भर पडेल. काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. किर्ती व मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक सुधारणा झाल्याने मनासारखा खर्च कराल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे.
आज परदेशगमनाचे योग येतील. फायदाही होईल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहील. सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल. मन प्रसन्न राहील. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल.
आज ग्रहयोग उत्तम आहे. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. तुमच्या रसिकतेला उधाण येईल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक प्रगती करणारा दिवस ठरेल.
आज आर्थिक ओढाताण संपेल. घर किंवा वाहन खरेदी कराल. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगती कारक दिनमान आहे. आपला नावलौकिक वाढेल. मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. वातावरण चांगले राहील. संत साहित्य आध्यात्मीक स्वरुपाचे लेखन होईल. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. मन सकारात्मक राहील.
आज एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. सगळ्यावर मात कराल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. दिवस फायदेशीर राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल.