मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky zodiac signs today : 'या' चार राशींसाठी आजचा दिवस आनंदी, सकारात्मक

Lucky zodiac signs today : 'या' चार राशींसाठी आजचा दिवस आनंदी, सकारात्मक

HT Marathi Desk HT Marathi
Sep 22, 2023 09:37 AM IST

Lucky zodiac signs today 22 september 2023 : चंद्र-राहु-गुरूचा अरिष्ट षडाष्टक योग आज 'या' चार राशींना लाभदायी ठरणार आहे. कोणत्या आहेत या राशी?

Lucky zodiac signs today
Lucky zodiac signs today

कर्क : आजचा दिवस आनंददायक आहे. कर्तृत्व उजळून निघेल. आपल्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. नवीन खरेदीचा योग आहे. कुटुंबात आणि समाजात मानसन्मान मिळेल. मुलांची प्रगती समाधान देऊन जाईल. व्यापार-व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. जोडीदारासोबत उत्तम संवाद होईल. कौटुंबिक मतभेद दूर होतील. परदेश प्रवासाचा योग आहे. त्यातून लाभ संभवतो. आरोग्य ठणठणीत राहील. शुभ रंगः गुलाबी. शुभ दिशा: वायव्य.

ट्रेंडिंग न्यूज

धनु : दिनमान शुभ आहे. कामाची सुरुवात सकारात्मक होईल. संपूर्ण दिवस उत्साहानं भरलेला असेल. धाडसानं निर्णय घेण्याचा मोह होईल, पण अतिआत्मविश्वासानं निर्णय घेऊ नका. व्यापार व्यवसायात नवीन संधीचा योग आहे. शुभकार्यात सहभागी घ्याल. विद्यार्थ्यांना अभ्यासाची ओढ लागेल. कुटुंबातील वातावरण सुखद असेल. अनपेक्षित धनलाभाचा योग आहे. लांबचा प्रवास घडेल आणि तो हितकारी ठरेल. शुभ रंग: पिवळा शुभ दिशा: ईशान्य.

सिंह : या राशीसाठी दिनमान खूपच उत्तम आहे. रोजगार धंद्यातील बदल लाभदायी ठरतील. आपल्या कार्यक्षेत्रात कौतुकाची थाप मिळेल. नव्या मित्रांची साथ मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या संबंधाचा फायदा मिळू शकतो, ही संधी सोडू नका. नवीन व्यावसायिक प्रस्ताव येतील व ते यशस्वी ठरतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. संयम बाळगल्यास आर्थिक लाभाचा योग आहे. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग आहे. समाजात व कुटुंबात प्रतिष्ठा वाढेल. आजच्या दिवशी केलेली मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. शुभ रंगः लालसर शुभ दिशा: पूर्व.

मिथुन : कार्यपद्धतीतील बदल खूपच फायदेशीर ठरेल. उद्योग-व्यवसायातील आर्थिक स्थिती उत्तम राहील. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली येणी मिळतील. नव्या संधीचा फायदा होईल. प्रेमप्रकरणाची गाडी पुढं सरकेल, संबंध दृढ होतील. नोकरीत प्रमोशनची शक्यता आहे. मित्रमंडळीकडून साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण सुखद व आनंदाचे असेल. आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत, प्रकृती स्थिर राहील. आर्थिक लाभाचा योग आहे. प्रवासाचा योग असून तो लाभदायी ठरण्याची शक्यता आहे. शुभ रंग: पोपटी शुभ दिशा: उत्तर.

WhatsApp channel