मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : स्पर्धापरिक्षेत यश मिळेल; या ५ राशींचा आत्मविश्वास द्विगुणीत होईल, भाग्य उजळेल

Today lucky zodiac signs : स्पर्धापरिक्षेत यश मिळेल; या ५ राशींचा आत्मविश्वास द्विगुणीत होईल, भाग्य उजळेल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 22, 2024 02:08 PM IST

Lucky Rashi Today 22 march 2024 : आज २२ मार्च २०२४ शुक्रवार रोजी ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात या ५ राशींना लाभदायक दिवस होईल. वाचा या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

नशीबवान राशी २२ मार्च २०२४
नशीबवान राशी २२ मार्च २०२४

आज शुक्रवार २२ मार्च रोजी, चंद्र सूर्याच्या सिंह राशीमध्ये भ्रमण करत आहे, तर कुंभ राशीमध्ये शुक्र आणि मंगळाचा संयोग तयार होत आहे, ज्यामुळे धन लक्ष्मी नावाचा राजयोग तयार होत आहे. तसेच आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे, ही तिथी शुक्रवारी येत असल्याने आजची प्रदोष तिथी शुक्र प्रदोष व्रत म्हणून ओळखली जाईल. शुक्र प्रदोष तिथीच्या दिवशी धन लक्ष्मी योगासह रवि योग आणि मघा नक्षत्राचा शुभ संयोग होणार आहे. अशा परिस्थितीत आज या ५ राशींसाठी दिवस खूप भाग्यवान असणार आहे.

मिथुन: 

आज आर्थिक प्रश्न सुटतील. आर्थिक नियोजन थोडे ढासळले तरी उभारी धरून ही संधी अवश्य पदरात पाडून घ्याल. अपेक्षित यश संपादन करता येईल. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. वास्तु खरेदी विक्रीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे. महिलांना धार्मिक सत्संग उत्तम घडेल. व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील. दिवस शुभ लाभदायी असणार आहे.

सिंह: 

आज आर्थिक बाबतीत दिवस फायदेशीर असणार आहे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. प्रिय व्यक्तीसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी दर्शवाल. परदेशगमनाच्या संधी येतील. आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. योग्य नियोजन अचुक निर्णय यामुळे यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. आज भाग्याची साथ लाभेल. 

तूळ: 

आज तुमच्या नवीन कल्पनेचं स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रति स्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मनात उत्साह राहील. जोडीदारांकडून सहकार्य लागेल. 

वृश्चिक: 

आज शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना यश मिळेल. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी करावी लागणारी तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल. धनप्राप्तीचा उत्तम संयोग निर्माण होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. घरात शुभ समाचार अथवा मंगलकार्य असा संयोग आहे. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील.

धनुः 

आज प्रवासाचे योग आहेत. आपल्या शांतीप्रिय स्वभाव आणि गुणवैशिष्ट्यामुळे पुरेपूर फायदा होईल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिनमान आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहील. आपल्या वाणीचा इतरांवर प्रभाव राहील. स्पर्धापरिक्षेत यश देणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल.

WhatsApp channel