मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : कामात यश मिळेल, प्रसिद्धीचे योग! 'या' ५ राशीच्या लोकांना दिवस ठरेल लकी

Lucky Zodiac Signs : कामात यश मिळेल, प्रसिद्धीचे योग! 'या' ५ राशीच्या लोकांना दिवस ठरेल लकी

Jun 22, 2024 04:00 AM IST

Lucky Rashi Bhavishya 22 June 2024 : आज ग्रह-नक्षत्रांच्या स्थान बदलाने शुक्ल योग, त्रिग्रही योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. अशात आजचा शुक्रवारचा दिवस या ५ राशींना लकी ठरेल.

लकी राशीभविष्य, नशीबवान राशी २२ जून २०२४
लकी राशीभविष्य, नशीबवान राशी २२ जून २०२४

आज शनिवार २२ जून २०२४ रोजी, गुरु ग्रह धनु राशीत चंद्राचे भ्रमण होणार आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी असून या तिथीपासून ज्येष्ठ महिना संपतो आणि ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा सुरू होतो. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी शुक्ल योग, ब्रह्म योग, लक्ष्मी नारायण योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योगाचा लाभ मिळणार आहे. जाणून घ्या आजच्या लकी राशी कोणत्या आहेत.

मेषः 

आज भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. आर्थिक फायदा होईल. धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल.

मिथुनः 

आज नवीन कल्पनांचे स्वागत होईल. यशाचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. यशाचा आनंद मिळणार आहे.

वृश्चिकः 

आज जोडीदाराशी संबंध सलोख्याचे राहतील. अपेक्षा पूर्ण होतील. मनात नसताना प्रवासाला जावे लागेत. तब्येत चांगली ठेवा. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. आर्थिकदृष्या लाभ होईल. 

धनुः 

आज कर्जफेड करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. तुमचा फायदा होऊ शकतो. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. तुमच्या स्वभावातील वेगळे कंगोरे प्रकर्षाने दिसून येतील. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर राहावे. ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. प्रसिद्धीचे योग आहे. 

कुंभः 

आज कार्यक्षेत्रात फायदा होईल. मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel