Lucky Zodiac Signs : संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल, कर्ज मंजूर होईल! सोमवारचा दिवस या ५ राशींसाठी लकी
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल, कर्ज मंजूर होईल! सोमवारचा दिवस या ५ राशींसाठी लकी

Lucky Zodiac Signs : संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल, कर्ज मंजूर होईल! सोमवारचा दिवस या ५ राशींसाठी लकी

Published Jul 22, 2024 04:30 AM IST

Lucky Rashi Bhavishya 22 July 2024 : आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी आहे तसेच सोमवार आहे. सोमवारी प्रीति योग, आयुष्मान योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि श्रवण नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. आजचा सोमवार या ५ राशींसाठी लकी राहील.

लकी राशीभविष्य २२ जुलै २०२४
लकी राशीभविष्य २२ जुलै २०२४

आज २२ जुलै २०२४ रोजी, चंद्र शनीच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी आहे तसेच सोमवार आहे. सोमवारी प्रीति योग, आयुष्मान योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि श्रवण नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. अशात या ५ राशींसाठी लकी दिवस आहे.

मेष: 

आज भाग्यकारक घटना घडतील. आकस्मिक लाभ होतील. मनस्वास्थ उत्तम राहील. तुमची कामे सहजगत्या होणार आहेत. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. कलाकारांचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील.जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. नशिबाची साथ चांगली मिळेल.

वृषभ: 

आज आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. कामानिमित्त परदेश गमनाच्या संधी मिळतील. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. व्यापारात तुमच्या हुशार व्यक्तिमत्वाचे दर्शन घडेल. घरात जवळच्या माणसांचे उत्तम सहकार्य मिळेल. दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. विवाह बद्दल इच्छित असणाऱ्याचे विवाह खात्रीशीर जुळतील. 

कर्क: 

आज तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. वैवाहीक जीवन सुखी राहील. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. 

कन्या: 

आज आर्थिक लाभ होईल. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालाल. बौद्धीक गोष्टींकडे ओढ राहील. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. 

तूळ: 

आज नोकरी धंद्याच्या ठिकाणी हवे तसे वातावरण मिळाल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक बाबतीमधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल.

Whats_app_banner