आज सोमवार २२ जानेवारी रोजी, वृषभ राशीनंतर चंद्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी असून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवियोग, ब्रह्मयोग आणि मृगाशिरा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात ५ राशींचे भाग्य चमकेल, धनवृद्धीचे योग व आनंदाचा अनुभव मिळेल.
आज ग्रह-नक्षत्र उत्तम असल्याने दिवस प्रगतीचा आहे. मनात उर्जा आणि सकारात्मना वाढेल. विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध बंड पुकाराल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. नवीन घर वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. आर्थिक सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. व्यापारी वर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल.
आज ऐंद्र योगात तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीस प्रकाशन साहित्यिक यांच्या करिता आनंदी दिवस आहे. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. वैवाहीक जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. कुटुंबात मंगल कार्य घडतील व वातावरण आनंददायक राहील.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात आपणास आर्थिक लाभ होईल. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. घरात आणि घराबाहेर उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालाल. बौद्धीक गोष्टींकडे ओढ राहील. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल असं वाटत असेल तर योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायदा होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. पदप्राप्ती होईल व मानसन्मान वाढेल.
आज शुभ ग्रह-नक्षत्राच्या योगामुळे नोकरी धंद्याच्या ठिकाणी हवे तसे वातावरण मिळेल व काम करण्याचा उत्साह वाढेल. बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक बाबतीमधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. विद्यार्थीवर्गासाठी आजचा दिवस शुभ राहील. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी मिळेल व मानधन वाढेल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान मिळेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. वैवाहिक जीवनात पत्नीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने आपले मनोबल उंचावेल.
आज ग्रह-नक्षत्राचा उत्तम संयोग असल्याने अंत्यत शुभ दिवस आहे. आकस्मिक लाभ होतील. आपल्या वाणीचा प्रभाव इतरावर पडेल. मनस्वास्थ उत्तम राहील. भाग्यकारक घटना घडतील. शत्रूला पूर्णपणे कोंडीत प्रहार करण्यावर तुमचा भर राहील. तुमची कामे सहज होतील. नशिबाची साथ चांगली मिळेल. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिवस आहे. सरकारी योजना आमलात आणल्या जातील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. उधारी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. प्रकृती स्थिर राहील. नवीन कार्यास आंरभ करण्यासाठी दिवस योग्य आहे.