मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : गुरुपुष्यामृत योगात आजचा दिवस या ५ राशींना फायदेशीर, गुंतवणूक लाभदायक ठरेल

Today lucky zodiac signs : गुरुपुष्यामृत योगात आजचा दिवस या ५ राशींना फायदेशीर, गुंतवणूक लाभदायक ठरेल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 22, 2024 04:46 PM IST

Lucky Rashi Today 22 february 2024: आज २२ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी, ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात या ५ राशींना दिवस फायदेशीर जाईल.

lucky zodiac signs today 22 february 2024
lucky zodiac signs today 22 february 2024

आज गुरुवार २२ फेब्रुवारी रोजी चंद्र स्वतःच्या राशीत कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, गुरु पुष्य योग आणि रवियोग यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.

सिंहः 

आज कामात यश मिळवाल. पराक्रमाची शर्थ कराल. यशाकडेच वाटचाल राहील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात उधारी वसूल होईल. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्य पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकां कडून आर्थिक मदत मिळेल. 

कन्याः 

आज आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. नवीन संधी येत आहे. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढेल व मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. 

तूळ: 

आज गुरुपुष्यामृत योगात आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहील. आनंदाची बातमी कळेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. 

धनुः 

आज कार्यक्षेत्रात उत्तम ठसा निर्माण करण्यास तुम्ही वरचढ ठराल. चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. मनासारखी कामे होतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहील. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. व्यापारात विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल.

मीनः 

आज गुरुपुष्यामृत योगात दूरच्या प्रवासाचे योग येतील. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होईल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती, मान-सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel