Lucky Zodiac Signs : भागीदारीत लाभ होतील; संधी मिळतील! या ५ लकी राशींना भरभराटीचा दिवस-lucky zodiac signs today 21 september 2024 astrology predictions for vrishabh mithun kark sinh vrishchik rashi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : भागीदारीत लाभ होतील; संधी मिळतील! या ५ लकी राशींना भरभराटीचा दिवस

Lucky Zodiac Signs : भागीदारीत लाभ होतील; संधी मिळतील! या ५ लकी राशींना भरभराटीचा दिवस

Sep 21, 2024 09:07 AM IST

Lucky Rashi Bhavishya 21 September 2024 : आज भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून, पितृ पक्षाच्या चतुर्थी श्राद्धाच्या दिवशी शश राजयोगासोबत हर्षण योग, मालव्य योग आणि भरणी नक्षत्राचा शुभ संयोग तयार होत आहे, आजचा दिवस या ५ लकी राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २१ सप्टेंबर २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २१ सप्टेंबर २०२४

आज शनिवार २१ सप्टेंबर रोजी, चंद्र मेष राशीनंतर वृषभ राशीत जाणार असून शनी स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत असल्यामुळे शश राजयोग तयार होत आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून या तिथीला चतुर्थी तिथीचे श्राद्ध केले जाते. श्राद्ध पक्षाच्या चौथ्या दिवशी शश राजयोगासोबत हर्षण योग, मालव्य योग आणि भरणी नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. या ५ राशींना शुभ योगाचा फायदा होणार आहे.

वृषभः 

आज व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल. मोठे यश लाभेल. नोकरीत मना सारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. कौटुंबिक सुखशांती आनंद दायक वातावरण राहील. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पदप्राप्ती आणि प्रतिष्ठा लाभेल.

मिथुन: 

आज तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. समस्या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा. रोजगारात मनासारखी बढती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कामाबाबत विसंबून राहू नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहील. आंनदाची बातमी मिळेल. 

कर्क: 

आज स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. आत्मविश्वास वाढेल. प्रसिद्ध व्हाल. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. खेळाच्या क्षेत्रात करियर करणारांना वेगवेगळ्या संधी मिळतील. नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. भागीदारीत लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. 

सिंहः 

आज आनंदी उत्साही राहाल. नोकरीत बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. वैवाहिक जीवनात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत. कामात यशस्वी राहाल. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. धावपळ फायदेशीर राहील. रोजगारात नवीन योजना राबवाल. प्रतिभेस वाव मिळेल. नोकरीत बढती मिळेल.

वृश्चिकः 

आज स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आध्यात्मिक उंची गाठाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. नोकरीत नवीन योजनेवर कार्य कराल. अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

Whats_app_banner