सिंह: गौरीपूजनाचा आजचा दिवस सिंह राशीसाठी यशदायी आहे. विवेकबुद्धीनं व नम्र भावनेनं काम केल्यास यश निश्चित आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. काही व्यक्तींना अनपेक्षित धनलाभाचा योग आहे. नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. सकारात्मक घटना घडतील. मन प्रसन्न राहिल्यानं नियोजित कामं वेगानं आणि वेळेत पार पडतील. प्रतिस्पर्ध्याला धोबीपछाड देण्यात यशस्वी व्हाल. भागीदारांकडून नवे प्रस्ताव येतील. प्रवासाचा योग आहे आणि हा प्रवास सुखकर होईल. शुभ रंगः लाल. शुभ दिशाः पूर्व.
मेष: नोकरीच्या ठिकाणी वातावरण सकारात्मक राहील. कामाच्या दृष्टीनं उपयुक्त चर्चा होईल. अनेक दिवस टाळलेली कामं पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. आर्थिक व्यवहार सुरळीत होतील. विद्यार्थ्यांसाठी देखील आजचा दिवस चांगला आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. व्यवसाय विस्ताराच्या योजना फलद्रूप होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना नव्या संधी आणि वाढीव मानधन मिळेल. कामाचं कौतुक होईल. संततीच्या बाबतीत आनंदवार्ता कानी येईल. पत्नीचा पूर्ण पाठिंबा संपूर्ण दिवस सकारात्मक करून टाकेल. शुभ रंगः तांबूस. शुभ दिशाः दक्षिण.
मीन: आजचा दिवस तुलनेनं चांगला आहे. आपल्या कामातून प्रतिष्ठा वाढेल. नोकरदार पत्नीला बढती आणि पगारवाढीची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. नवे मित्र जोडले जातील. नोकरीत नव्या जबाबदाऱ्या खांद्यावर पडतील. सामाजिक यशात थोरामोठ्यांचा सहभाग राहील. आर्थिक प्राप्तीचा नवा मार्ग सापडेल. आनंदवार्ता कानी येईल. शुभ रंगः पिवळसर शुभ दिशाः ईशान्य.
मिथुन: दिनमान यशदायी असल्यानं आलेली संधी आज वाया घालवू नका. रोजगारात यश मिळेल. तुमच्याकडून व्यवसाय विस्ताराच्या योजना आखल्या जातील. आपल्या कार्यक्षेत्रात नवकल्पनांवर काम सुरू करा. राजकीय व्यक्तींचा सहवास लाभेल. व्यवसायात विस्तारासंबंधी योजना आखाल. अपेक्षित घटना घडतील. लोकांवर छाप पाडाल. आपला मुद्दा पटवून देण्यात यश येईल. आर्थिक लाभामुळं आनंदवृद्धी होईल. मुलांविषयीची चिंता मिटेल. कौटुंबिक सुख लाभेल. शुभ रंगः पोपटी शुभ दिशाः उत्तर.
तुला: नोकरीच्या ठिकाणी तुमचं कर्तृत्व सिद्ध कराल. नवीन संधी चालून येतील. व्यासायिक स्पर्धेत यश मिळेल. व्यवसाय किंवा रोजगारात सकारात्मक बदल संभवतो. तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल. सरकार दरबारी मानमरातब मिळेल. धनलाभही संभवतो. पत्नीची उत्तम साथ लाभेल. शुभवार्ता कानी पडतील. हुशारीनं काम केल्यास आजचा आजचा दिवस अत्यंत फलदायी आहे. आर्थिक प्रश्न सोडवले जातील. प्रवासातून लाभ होईल. परदेश प्रवासाचा योग आहे. मानसिक समतोल संभाळा. शुभ रंगः गुलाबी शुभ दिशाः आग्नेय.