Lucky Zodiac Signs : आज भाग्याची लाभणार साथ! या ५ लकी राशींची होणार भरभराट; मिळणार यश, आनंद
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : आज भाग्याची लाभणार साथ! या ५ लकी राशींची होणार भरभराट; मिळणार यश, आनंद

Lucky Zodiac Signs : आज भाग्याची लाभणार साथ! या ५ लकी राशींची होणार भरभराट; मिळणार यश, आनंद

Updated Oct 21, 2024 08:27 AM IST

Lucky Rashi Bhavishya 21 October 2024 : आज पंचमीचा चंद्र वृषभ व मिथुन राशीतून, तसेच मृगशीर्ष नक्षत्रातून गोचर करणार आहे. आज वरियान योगाबरोबरच अमृत योग देखील आहे. अशात या ५ राशीच्या लोकांचा आज भरभराटीचा आणि आनंदाचा दिवस आहे.

लकी राशिभविष्य २१ ऑक्टोबर २०२४
लकी राशिभविष्य २१ ऑक्टोबर २०२४

आज सोमवार २१ ऑक्टोबर रोजी, चंद्र वृषभ आणि मिथुन राशीतून गोचर करत आहे. याबरोबरच तो मृगशीर्ष नक्षत्रातूनही गोचर करणार आहे. आज वरियान योग आणि अमृत योग आहे. अशात या पाच राशींची भरभराट होणार आहे. तसेच या ५ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस यश घेऊन येत आहे.

 

वृषभ:

आज शुक्र चंद्र षडाष्टक योगात वृषभ राशीच्या जातकाला भाग्याची चांगली साथ मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहणार आहे. आपल्या जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. शासकीय सेवेतील मंडळींना देखील उत्तम दिवस आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराट होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. 

 

सिंह:

आज चंद्र शुक्र षडाष्टक योगात तुमच्यातील कला लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. तुमच्या बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. त्यामुळे काही गोष्टी आपसूकच तुमच्या हिताच्या झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. रोजगारात संतोषजनक गोष्टी घडतील. सामाजिक मान सन्मान वाढेल. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात, परीक्षेत व मुलाखतीत यश मिळेल.

 

कन्याः

आज राजयोग असल्याने विद्यार्थ्यांसाठी आज चांगला दिवस आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनेक मार्गांनी संधी येतील. परदेशासंदर्भात काही अडलेली कामे मार्गी लागतील. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. सिनेमासृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग येतील. एखादी गोष्ट भाग्यात असली तर मिळते याचा प्रत्यय येईल. आपल्या महत्वाकांक्षेनुसार यश मिळेल. आजचा दिवस भाग्योदयाचा आहे. आज आपणास नशीबाची साथ लाभणार आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक, तसेच सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. व्यवहारकुशलतेमुळे आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तुतीस पात्र ठराल.

 

 

वृश्चिकः

आज वरियान योगात संतुलित विचाराचा पाठपुरावा करण्याच्या तुमच्या स्वभावाचा तुम्हाला फायदा होणार आहे.  मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. नोकरीत अडलेली सर्व कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील. मानसन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी आज भरभराटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील.

 

कुंभ:

आज वरियान योगात नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणारांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. तुमचे मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात चांगला लाभ होतील. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. आपणास मुशाफिरीत लाभ होईल.

 

 

Whats_app_banner