मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : नावलौकीक वाढेल, या ५ राशींना धनलाभाचा योग; नशीब उजळेल

Today lucky zodiac signs : नावलौकीक वाढेल, या ५ राशींना धनलाभाचा योग; नशीब उजळेल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 21, 2024 01:47 PM IST

Lucky Rashi Today 21 march 2024 : आज २१ मार्च २०२४ गुरुवार रोजी ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात या ५ राशींना लाभदायक दिवस होईल. वाचा या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

नशीबवान राशी २१ मार्च २०२४
नशीबवान राशी २१ मार्च २०२४

आज गुरुवार २१ मार्च रोजी चंद्र कर्क राशीनंतर सिंह राशीत जाणार आहे. तसेच आज फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी असून या दिवशी सुकर्मा योग, धृतिमान योग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होणार आहे, त्यामुळे आजचे महत्त्वही वाढले आहे. या ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने त्यांना फायदा होणार आहे.

मेषः 

आज आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. नवीन वस्तूंची खरेदी कराल. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. मन प्रसन्न राहील. अडचणी दूर होतील. आत्मविश्वास वाढेल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल.

वृषभः 

आज आर्थिक स्थिती सुधारेल. उत्तम सहकार्य मिळेल. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. उत्तम प्रतिसाद मिळेल. मानसन्मानाचे योग येतील. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहील. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. विरोधकांवर मात कराल. 

कर्कः 

आज कार्यक्षेत्रात उत्तम ठसा निर्माण करण्यास तुम्ही वरचढ ठरणार आहात. चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. मनासारखी कामे होतील. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहील. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. व्यापारात विस्तार होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल.

तूळ: 

आज कष्टाचे चीज होईल. ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. 

धनुः 

आज तब्येत खूष राहील. प्रवासाचे योग येतील. महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती, मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. नवीन योजना पूर्णत्वास जातील.