मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : ज्येष्ठ पौर्णिमा आणेल जीवनात आनंदाचे क्षण! 'या' ५ राशीच्या लोकांना दिवस ठरेल लकी

Lucky Zodiac Signs : ज्येष्ठ पौर्णिमा आणेल जीवनात आनंदाचे क्षण! 'या' ५ राशीच्या लोकांना दिवस ठरेल लकी

Jun 21, 2024 04:00 AM IST

Lucky Rashi Bhavishya 21 June 2024 : आज ग्रह-नक्षत्रांच्या स्थान बदलाने शुक्ल योग, त्रिग्रही योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. अशात आजचा शुक्रवारचा दिवस या ५ राशींना लकी ठरेल.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २१ जून २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २१ जून २०२४

आज शुक्रवार २१ जून २०२४ रोजी, मिथुन राशीमध्ये बुध आणि शुक्राच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होत असून, चंद्र वृश्चिक राशीनंतर धनु राशीत जाणार आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा असून या दिवशी वटपौर्णिमेचे व्रत पाळण्यात येणार आहे. या दिवशी शुक्ल योग, त्रिग्रही योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज ५ राशीच्या लोकांना खास लाभ होणार आहे. जाणून घ्या आजच्या लकी राशी कोणत्या आहेत.

मेष: 

आज कार्यक्षेत्रात ठोस निर्णय घेऊ शकाल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. व्यापारी वर्गासाठी बर्‍याच संधी प्राप्त होतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. आर्थिक मदत मिळेल.

तूळ: 

आज गुंतवणक फायदेशीर ठरेल. रोजगारात तुमची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. मुलांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेने अधिक लाभ होईल. नोकरी व्यवसायात मात्र आपला वेगळा ठसा उमटवाल.  तुमची पदोन्नती व प्रगती होईल. 

धनु: 

आज कुटूंबात स्नेह वाढेल. नवीन योजना यशस्वी होतील. मनःशांती मिळेल. फक्त यामध्ये थोडे धाडस दाखवा. नोकरीत आत्म विश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्त्रोत निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. मनोकामना पूर्ण होणार आहे. मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. 

कुंभ: 

आज लोकांचे सहकार्य उत्तम ठरेल. तुम्ही इतके आशावादी आहात की तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. जमीन बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होईल. 

मीनः 

आज नोकरीच्या ठिकाणी काम करण्यास उत्साह येईल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सहभागी व्हाल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. 

WhatsApp channel